
वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. आता आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटसाठी शुभमन गिल तर आंतरराष्ट्रीय टी २० साठी सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करणार आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधून निवृत्त झालेले रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून खेळणार आहेत. या धोरणानुसार भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शुभमन गिलकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी शुभमन गिल रोहित शर्माकडून कर्णधारपदाची सूत्रं स्वीकारेल. एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून गिलची ही पहिलीच मालिका असेल, यापूर्वी त्याने कसोटी आणि टी-२० संघांचे नेतृत्व केले आहे. आयसीसीच्या २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून कर्णधारपदात हा बदल करण्यात आला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय पुरुष क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ (एकदिवसीय सामन्यांची मालिका २०२५)
शुभमन गिल, कर्णधार
रोहित शर्मा
विराट कोहली
श्रेयस अय्यर, उपकर्णधार
अक्षर पटेल
केएल राहुल, यष्टीरक्षक
नितीश कुमार रेड्डी
वॉशिंग्टन सुंदर
कुलदीप यादव
हर्षित राणा
मोहम्मद सिराज
अर्शदीप सिंग
प्रसिध कृष्णा
ध्रुव जुरेल, यष्टीरक्षक
यशस्वी जयस्वाल
निवड समितीने आशिया कप २०२५ या टी २० क्रिकेट स्पर्धेसाठी निवडलेला संघच ऑस्ट्रेलिया विरुद्ध २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ (पाच टी-२० सामन्यांची मालिका)
सूर्यकुमार यादव, कर्णधार
अभिषेक शर्मा
शुभमन गिल, उपकर्णधार
तिलक वर्मा
नितीश कुमार रेड्डी
शिवम दुबे
अक्षर पटेल
जितेश शर्मा, यष्टीरक्षक
वरुण चक्रवर्ती
जसप्रीत बुमराह
अर्शदीप सिंग
कुलदीप यादव
हर्षित राणा
संजू सॅमसन, यष्टीरक्षक
रिंकु सिंग
वॉशिंग्टन सुंदर
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५
पहिली ODI - रविवार १९ ऑक्टोबर - पर्थमधून सकाळी ९ पासून LIVE
दुसरी ODI - गुरुवार २३ ऑक्टोबर - अॅडलेडमधून सकाळी ९ पासून LIVE
तिसरी ODI - शनिवार २५ ऑक्टोबर - सिडनीतून सकाळी ९ पासून LIVE
पहिली T20I - बुधवार २९ ऑक्टोबर - कॅनबेरातून दुपारी १.४५ पासून LIVE
दुसरी T20I - शुक्रवार ३१ ऑक्टोबर - मेलबर्नमधून दुपारी १.४५ पासून LIVE
तिसरी T20I - रविवार २ नोव्हेंबर - होबार्टमधून दुपारी १.४५ पासून LIVE
चौथी T20I - गुरुवार ६ नोव्हेंबर - गोल्ड कोस्टमधून दुपारी १.४५ पासून LIVE
पाचवी T20I - शनिवार ८ नोव्हेंबर - ब्रिस्बेनमधून दुपारी १.४५ पासून LIVE