नवी दिल्ली : स्वामी विवेकानंद जयंती निमित्त दरवर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा करतात. शिकागोच्या धर्मसभेत स्वामी विवेकानंद यांनी जगाला हिंदू धर्माची सहज, सोप्या, सुंदर शब्दात नव्याने ओळख करुन दिली होती. स्वामी विवेकानंद यांचे कार्य आजही तरुणांना प्रेरणादायी असे आहे. या कार्याची आठवण आणि स्वामी विवेकानंदांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. भारत सरकारने १९८४ मध्ये राष्ट्रीय युवा दिनाची घोषणा केली आणि १२ जानेवारी १९८५ पासून राष्ट्रीय युवा दिन अर्थात राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
स्वामी विवेकानंद;एक स्मरण
विवेकानंदानी आपली हिंदू संस्कृती जोपासत लोकांच्या काळजाला हात घातला. त्या दिवसापासून उभी अमेरिका नव्हे जगातील लोक विवेकानंदांना ओळखू लागले. एक ...
स्वामी विवेकानंद हे तत्वज्ञ, अध्यात्म गुरु, समाजसुधारक आणि धार्मिक शिक्षक होते. त्यांच्या आत्मनिर्भरता, शिस्त, शिक्षण आणि राष्ट्रीय विकासाच्या मूल्यांवरील शिकवणीने तरुणाईला प्रेरणा दिली. कठोर परिश्रम आणि स्वयंशिस्तीने तरुण देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, असे विवेकानंद म्हणायचे. स्वामी विवेकानंदांचा हाच विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी शैक्षणिक संस्था राष्ट्रीय युवा दिन उत्साहाने साजरा करतात.
नृग राजा व ब्राह्मणाची गाय
भालचंद्र ठोंबरे
एके दिवशी भगवान श्रीकृष्णाचे पुत्र प्रद्युम्न, सांब, चारुभानू, गद आणि यदु हे सर्व वनविहारासाठी उपवनात गेले. खूप खेळणे, बागडणे झाल्यावर ...
भारत हा तरुणांचा देश आहे. सध्या जगात सर्वाधिक तरुण भारतात आहेत. यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिनाचे विशेष महत्त्व आहे. भारतातील तरुणांच्या क्षमतेचा आणि योगदानाचा गौरव करणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय युवा दिन. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशातील शाळा - महाविद्यालयांमध्ये मिरवणुका, भाषणे, संगीत, युवा संमेलने, परिसंवाद, योगासने, सादरीकरणे, निबंध-लेखन, पठण आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.