Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीEd Raid: ५०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणातील त्या अधिकाऱ्याला ५ दिवसांची ईडी कोठडी

Ed Raid: ५०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणातील त्या अधिकाऱ्याला ५ दिवसांची ईडी कोठडी

मुंबई: भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेले वरिष्ठ आयआरएस अधिकारी (Senior IRS Officer) सचिन सावंत (Sachin Sawant) यांना ५ जुलैपर्यंत ईडी कोठडी (ED Custody) सुनावण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान, सचिन सावंत हे माजी ईडी अधिकारी (Former ED Employee) आहेत. एका हिरे व्यापाऱ्यांकडून ५०० कोटींहून अधिक रक्कम बेकायदेशीरपणे वळवणं आणि हस्तांतरित केल्याचा सावंत यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत.

सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन सावंत (Former ED Employee Sachin Sawant) यांच्या मुंबईतील (Mumbai News) निवासस्थानावर ईडीकडून मंगळवारी छापा टाकण्यात आला. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. काल मध्यरात्रीपर्यंत सावंत यांच्या घरी ईडीचा तपास सुरू होता. 500 कोटी रुपये बेकायदेशीररित्या वळवल्याच्या एका प्रकरणातील आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून सीबीआयनं (CBI) एफआयआर (FIR) दाखल केली. आणि याच प्रकरणी काल ईडीनं (ED) छापेमारी केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -