Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेBakri Eid: बकरी ईदच्या कुर्बानीवरुन उच्चभ्रु सोसायटीत वाद

Bakri Eid: बकरी ईदच्या कुर्बानीवरुन उच्चभ्रु सोसायटीत वाद

पोलीस आणि रहिवाश्यांमध्ये बाचाबाची

मीरा रोड: मीरा रोडमधील (Mira Road News) एक उच्चभ्रु सोसायटीत बकरी ईदला (Bakari Eid) कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरुन वाद झाल्याची घटना घडली आहे. बकरी ईदनिमित्त दोन बकरे आणण्यात आले होते. हा प्रकार सोसायटीतील लोकांना कळताच लोकांनी एकच गोंधळ घातला. यासोबतच विरोध असणाऱ्या लोकांनी सोसायटीच्या आवारात हनुमान चालिसा पठण केले. अखेर पोलिसांच्या मदतीने वाद मिटवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेपी इन्फ्रा या उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. सोसायटीत राहणारे मोहसीन शेख यांनी बकरी ईदनिमित्त सोसायटीत दोन बकरे आणले होते. ही बाब सोसायटीत समजल्यानंतर सोसायटीतील काही लोकांनी सोसायटीत एकत्र येत निषेध केला. बकऱ्याला बाहेर काढा अशी सोसायटीतील लोकांनी मागणी सुरु झाली. या गदारोळात लोकांनी हनुमान चालिसाचा पठणही सुरू केले आणि जय श्री रामच्या घोषणा ही दिल्या. काशिमीरा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचू वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. डीसीपी जयंत बजबळे यांनी लोकांची समजूत काढली आणि राग शांत केला. यावेळी सोसायटीतील लोक आणि पोलिसांमध्ये थोडी बाचाबाचीही झाली.

बकरी घेऊन आलेल्या मोहसीनच्या म्हणण्यानुसार, या सोसायटीत २०० ते २५० मुस्लिम कुटुंब राहतात. दरवर्षी बिल्डर आम्हाला बकरी ठेवण्यासाठी जागा देतो, पण यावेळी बिल्डरने सांगितले की आमच्याकडे जागा नाही, यासाठी तुमच्या सोसायटीशी बोला. मोहसीनच्या म्हणण्यानुसार त्यांनी सोसायटीकडे बकरी ठेवण्यासाठी जागा मागितली होती, पण सोसायटीने जागा दिली नाही. म्हणून मोहसीनने मंगळवारी पहाटे दोन बकऱ्या आणल्या. आम्ही सोसायटीत कधीच कुर्बानी देत नाही, आम्ही नेहमी कत्तलखान्यात किंवा बकऱ्यांच्या दुकानात बकऱ्याची कुर्बानी देतो, असं मोहसीनने सांगितलं आहे. तसेच जमलेल्या जमावाने गैरवर्तणूक आणि शिवीगाळ केल्याचा आरोप मोहसीनने केला आहे. सोसायटीतील लोकांनी मात्र सोसायटीत बकरीही आणू शकत नाही, कुर्बानीही देऊ शकत नाही असे सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -