Sunday, May 19, 2024
HomeदेशNipah Virus: कोझिकोडमध्ये शाळा-कॉलेज १७ सप्टेंबरपर्यंत बंद

Nipah Virus: कोझिकोडमध्ये शाळा-कॉलेज १७ सप्टेंबरपर्यंत बंद

कोझिकोड: केरळ सरकारने निपाह व्हायरसचा (nipah virus) प्रसार रोखण्यासाठी कोझिकोडमध्ये शाळा-कॉलेजमधील सुट्टी १६ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. दोन दिवस आधीच राज्यात या घातक व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. निपाह व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता सुरक्षेचा उपाय म्हणून कोझिकोड जिल्ह्यात आंगणवाडी, मदरशे, क्लासेस तसेच प्रोफेशनल कॉलेजसह सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

यातच राज्य सरकारने म्हटले की, निपाह व्हायरसचे संक्रमण झालेल्या लोकांच्या उपचारासाठी गरजेचे मोनोक्लोनल अँटीबॉडी राज्यात पोहोचली आहे. केरळचे आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्यात बैठक झाली होती आणि आता मोनोक्लोन अँटीबॉडी आली आहे.

निपाह व्हायरसला घाबरण्याची गरज नाही

मंत्र्यांनी याआधी राज्यात विधानसभेत म्हटले होते की लोकांनी कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसच्या प्रकोपाबद्दल घाबरण्याची गरज नाही. मात्र आपल्या रोजच्या दिनचर्येत सावधानता बाळगली पाहिजे. त्यांनी विधानसभेत विधान केले की घाबरण्याची गरज नाही. सर्वांनी मिळून सावधानतेने याचा सामना करूया.

कोझिकोडमध्ये निपाहमुळे दोघांचा मृत्यू

निपाह व्हायरसमुळे कोझिकोडमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जणांना व्हायरसची लागण झाली आहे. राज्यात बुधवारी २४ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला या व्हायरसची लागण झाली. केरळमधील हे पाचवे प्रकरण आहे. तीन जणांवर उपचार सुरू आहेत. यात नऊ वर्षाच्या मुलाची स्थिती गंभीर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -