Friday, May 17, 2024
Homeक्रीडाPAK vs SL: आशिया चषकातून बाहेर पडताच चिडला कर्णधार बाबर

PAK vs SL: आशिया चषकातून बाहेर पडताच चिडला कर्णधार बाबर

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या(asia cup 2023) फायनलमध्ये १७ सप्टेंबरला टीम इंडियाची टक्कर श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकाने पाकिस्तानला हरवत फायनलमध्ये स्थान पटकावले. कुशल मेंडिसच्या अर्धशतकानंतर चरिथ असलंकाच्या शानदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेत डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला २ विकेट राखत हरवले.

आशिया चषकातून बाहेर पडल्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठे विधान केले आहे तसेच त्याने खराब कामगिरीबाबतही संघावर टीका केली.

श्रीलंकेच्या संघाची जबरदस्त कामगिरी

पाकिस्तानच्या २५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकाच्या मेंडिसने ८७ बॉलमध्ये ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९१ धावांची खेळी केली आणि समरविक्रमसह त्याने तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. यामुळे श्रीलंकेला शेवटच्या बॉलवर विजय मिळवता आला.

या सामन्यातही पावसाचा व्यत्यय

पावसामुळे सामन्याला सुरूवात होण्यास उशीर झाला. त्यामुळे सामना ४५ ओव्हरचा करण्यात आला. सामन्यात दोनदा पावसाने व्यत्यय आणला यामुळे षटकांची संख्या घटवून ४२ इतकी करण्यात आली. श्रीलंकेला डकवर्थ लुईस नियमानुसार २५२ धावांचे आव्हान मिळाले.

संघाच्या पराभवानंतर चिडला बाबर

आशिया चषकातून बाहेर पडल्यावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सांगितले, श्रीलंकेने वास्तवात चांगला खेळ केला. त्यांनी आमच्यापेक्षा चांगला खेळ केला यामुळेच ते जिंकले. आम्ही गोलंदाजी आणि फिल्डिंग चांगली केली नाही. म्हणूनच आमचा पराभव झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -