Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीSana khan murder case: सना खान हत्या प्रकरणात आरोपी अटकेत, गुन्हा केला...

Sana khan murder case: सना खान हत्या प्रकरणात आरोपी अटकेत, गुन्हा केला कबूल

नागपूर: नागपूरमधील (nagpur) भाजप नेत्या (bjp) सना खान हत्या (sana khan murder case) प्रकरणात पोलिसांच्या क्राईम ब्राँचने आरोपी पप्पू उर्फ अमित शाहूला जबलपूर (jabalpur) येथून अटक (arrest) केली आहे. चौकशीदरम्यान त्याने हत्या केल्याचे कबूल केले. पोलीस आरोपीला घेऊन नागपूरला रवाना झाली. नागपूर शहराचे झोन २ चे डीसीपी राहुल मदने यांनी याला दुजोरा दिला.

भारतीय जनता पक्षाच्या नेता सना खान १ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. त्या आपल्या बिझनेस पार्टनरला भेटण्यासाठी मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये गेल्या होत्या. त्यांनी आपल्या कुटुंबियांना आपण दोन दिवसांत परतू असे सांगितले होते. मात्र एक आठवडा झाला तरी त्यांचा काही पत्ता लागला नाही. तसेच त्यांचा फोनही बंद येत होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्याची हरवल्याची तक्रार नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात केली. सना जबलपूरमध्ये आपला बिझनेस पार्टनर पप्पू शाहूला भेटायला गेली होती. मात्र मुलीचा काहीच पत्ता नाही. तिचा फोनही बंद येत असल्याची माहिती तिच्या घरच्यांनी पोलिसांना दिली.

पैशांवरून दोघांमध्ये वाद

पप्पू दारूची तस्करी करत होता. तसेच जबलपूरजवळ तो एक ढाबा चालवत होता. सना आणि पप्पू यांच्यात काही दिवसांपासून पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता. हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांची एक टीम जबलपूरला गेली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची टीम तेथे पोहोचण्याआधीच पप्पू शाहू आपल्या कुटुंबासह फरार झाला होता. यानंतर सातत्याने पोलीस त्याचा शोध घेत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -