होळी, धुलीवंदनासाठी नियमावली

Share

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. दोन वर्षानंतर निर्बंध शिथिल झाले असल्याने यावेळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी कोरोना संसर्गवाढीला कारणीभूत ठरू नये म्हणून राज्य सरकारने हे सण साजरे करण्यासाठी नियमावली जारी केली आहे.

राज्याच्या गृहविभागाने होळी तसेच धुलीवंदन साजरा करण्यासाठीची नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच होळीदरम्यान डीजे लावण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, गृह विभागाने जारी केलेली नियमावली तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, गर्दी करु नये, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

गृहखात्याने जारी केलेले नियम

– रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक.

– होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी.

– दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल.

– होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल.

– होळी खेळताना महिला तसेच मुलींची खबरदारी घेण्याचे आवाहन.

– कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.

– धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.

Recent Posts

पंतप्रधान मोदींची १० मेला पिंपळगावला जाहीर सभा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली माहिती नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आम्ही…

28 mins ago

सर्वांगीण विकासासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सज्ज व्हा – नारायण राणे

रत्नागिरी जिल्हा परिषद गटातील मेळाव्यांना प्रचंड प्रतिसाद रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला महासत्ता…

1 hour ago

नांदरुख गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : भाजपा नेते निलेश राणे

मालवण : नांदरुख गावच्या विकासकामांना प्राधान्य देत, गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे भाजपा नेते निलेश…

3 hours ago

गाडी अडवून घोषणा देणारे मराठा आंदोलक नव्हतेच

हा प्रायोजित कार्यक्रम असल्याचा पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड : माझी गाडी अडवून घोषणा देणारे मराठा…

4 hours ago

मुख्यमंत्री होण्याआधी ठाकरे चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कधी गेले ते दाखवा

भाजपा आमदार नितेश राणे यांचा घणाघात कणकवली : मुख्यमंत्री होण्याअगोदरचा चैत्यभूमीवर अभिवादन करतानाचा उद्धव ठाकरे…

4 hours ago