Saturday, May 18, 2024
Homeमहामुंबई३,२५४ विद्यार्थ्यांचे आर.टी. ई. प्रवेश निश्चित

३,२५४ विद्यार्थ्यांचे आर.टी. ई. प्रवेश निश्चित

येत्या शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात

मुंबई (प्रतिनिधी) : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रकियेअंतर्गत ऑनलाईन सोडत बुधवार दिनांक ३० मार्च २०२२ रोजी काढण्यात आली होती.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ऑनलाईन लॉटरीनुसार निवड यादीतील विद्यार्थी संख्या ५ हजार ३४२ तर प्रतिक्षा यादीवरील विद्यार्थी संख्या ३ हजार ७८९ इतकी आहे. तर निवड यादीतील ५ हजार ३४२ बालकांपैकी ३ हजार २५४ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित झालेले आहेत. तर ५४ विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरलेले असून २ हजार ०३४ पालकांनी पडताळणी समितीशी / शाळेशी संपर्क साधलेला नाही. निवड यादीतील विद्यार्थ्यांकरीता प्रवेशाची वाढीव मुदत यापूर्वीच म्हणजे दिनांक १० मे २०२२ रोजी संपुष्टात आलेली आहे.

शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या दिनांक १८ मे २०२२ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त निर्देशानुसार, गुरुवार दिनांक १९ मे २०२२ रोजी दुपारी ३.०० नंतर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसेच दिनांक १९ मे २०२२ पासून प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस जाण्यास देखील सुरुवात झालेली आहे. तथापि, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता ‘RTE PORTAL’ वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी. वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे अवलोकन करावे व या माहितीचा लाभ घ्यावा.

प्रतिक्षा यादीतील बालकाच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून ऍलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी. हे ऍलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेवून विहित मुदतीत नजिकच्या पडताळणी समितीकडे जाऊन पडताळणी समितीकडून दिनांक १९ मे २०२२ ते २७ मे २०२२ या कालावधीमध्ये कागदपत्रांची तपासणी करून आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जावे आणि शाळेमध्ये प्रवेश घ्यावा, असे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -