Tuesday, May 14, 2024
Homeताज्या घडामोडीRRB Recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये ८ हजारांहून अधिक TTE पदासाठी भरती!

RRB Recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये ८ हजारांहून अधिक TTE पदासाठी भरती!

कशी असणार अर्ज आणि निवड प्रक्रिया?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या रेल्वे भर्ती बोर्ड Indian Railways Railway Recruitment Board (RRB) ८ हजार प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) पदांसाठी रिक्त जागांसाठी भरती करणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट देऊन माहिती घेऊ शकतात. अर्जाची प्रक्रिया मे २०२४ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा असून ती जून २०२४ मध्ये संपणार आहे. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

नोकर भरतीचा तपशील

पोस्ट : प्रवासी तिकीट परीक्षक: ८,०००+
वयोमर्यादा : किमान वय – १८ वर्षे
कमाल वय – २८ वर्षे
पगार : रु. २७,४०० ते रु. ४५,६०० असा अपेक्षित आहे.

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

कशी असेल निवड प्रक्रिया?

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी
  • वैद्यकीय चाचणी
  • अर्ज फी
  • सामान्य आणि ओबीसी श्रेणींसाठी: रु. 500
  • अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी: रु. 300

अर्ज कसा करावा?

  • पहिल्यांदा indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर latest ऑप्शनवर गेल्यानंतर Railway TTE recruitment 2024 सर्च करा.
  • Railway TTE recruitment Section मध्ये Apply Online link क्लिक करा.
  • येथे सर्व माहिती भरावी लागेल आणि पुढील बटणावर (Next Button) क्लिक करा.
  • आकारानुसार तुमचा फोटो आणि अंगठ्याचे ठसे अपलोड करा.
  • पुढील पेजवर, तुम्ही फी जमा करा आणि तुमची तारीख सेव्ह करा आणि तुमचा फॉर्म सबमिट करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -