Home क्रीडा IND vs NZ: पाचवा टी20 सामना जिंकल्यानंतर मिचेल सँटनरने मालिकेबाबत केलं मोठं विधान, तसं झालं असतं तर…

IND vs NZ: पाचवा टी20 सामना जिंकल्यानंतर मिचेल सँटनरने मालिकेबाबत केलं मोठं विधान, तसं झालं असतं तर…

0
IND vs NZ: पाचवा टी20 सामना जिंकल्यानंतर मिचेल सँटनरने मालिकेबाबत केलं मोठं विधान, तसं झालं असतं तर…
IND vs NZ: पाचवा टी20 सामना जिंकल्यानंतर मिचेल सँटनरने मालिकेबाबत केलं मोठं विधान, तसं झालं असतं तर... (Photo: ANI)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी20 सामना हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे पार पडला. या सामन्यात न्यूजीलंडने 7 गडी आणि 12 चेंडू राहून भारताला मात दिली. भारताने विजयासाठी ठेवलेलं 192 धावांचं लक्ष्य सहज गाठलं. यापूर्वी चौथ्या टी20 न्यूझीलंडने भारताला 87 धावांनी पराभूत केलं होतं. पण शेवटच्या दोन सामन्यात विजय मिळवूनही मालिका न्यूझीलंडच्या हातून गेली. भारताने पहिल्या तीन सामन्यात सलग विजय मिळवला होता. त्यामुळे मालिका भारताने 3-2 ने जिंकली. पण पाचव्या टी20 सामन्यातील विजयानंतर कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, या मालिकेचा निकाल याच्या उलटही लागू शकला असता.

काय म्हणाला न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर?

पाचव्या टी20 सामन्यातील विजयानंतर मिचेल सँटनर म्हणाला की, मालिकेबाबत आम्ही नक्कीच विचार करू. सँटनरने पुढे सांगितलं की, ‘आम्हाला माहित आहे की एक खूप चांगल्या संघाविरुद्ध ही अतितटीची मालिका होती. पण हो तुम्ही म्हणालात त्या प्रमाणे पहिल्या काही सामन्यात असे काही क्षण होते जिथे आम्ही कदाचित जिंकू शकलो असतो किंवा जिंकायलाच पाहिजे होते. जर तसं झालं असतं तर या मालिकेचा निकाल काही वेगळा लागला असता.’

https://www.prahaar.in/2026/11/01/ind-vs-nz-t20-what-went-wrong-in-the-last-two-matches-against-new-zealand-captain-shreyas-iyer-points-out-the-errors/

मिचेल सँटनर पुढे म्हणाला की, ‘क्रिकेटच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर या मालिकेत बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या. फलंदाजी चांगली झाली आणि आमच्या खेळाडूंनी गेल्या काही सामन्यात गोलंदाजीतही उत्कृष्टपणे कामगिरी केली. ही सकारात्मक बाब आहे. अर्थात मालिका भारताच्या बाजूने 3-2 अशी आहे. पण निकाल याच्या उलटही लागू शकला असता. ‘

ग्लेन फिलिप्सच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल सँटनर म्हणाला की, प्रत्येक सामन्यात अशी कामगिरी करणं खूप विशेष आहे. तो स्वतःला थोडा वेळ देतो आणि मग तो योग्य ठिकाणी फटके मारू शकतो, काही जोरदार फटके खेळू शकतो. जसं आपण पाहिलं आहे, एका चांगल्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध. तो एक उत्तम संघ आहे. त्यामुळे त्याने प्रत्येक सामन्यात अशी कामगिरी करणं आणि फलंदाजीने आम्हाला चांगल्या स्थितीत आणणं, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात, मला वाटतं की फलंदाजी खूप चांगली झाली आहे. बहुतेक सामन्यांमध्ये 200 धावा आणि अर्थातच 260 धावा सुद्धा. तर हो, आणि तो त्यात एक महत्त्वाचा भाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here