Home ताज्या घडामोडी What If Oxygen Disappears: फक्त 5 सेकंदासाठी पृथ्वीवरून ऑक्सिजन गायब झाला तर? जगण्याची कल्पना करणंच अशक्य!

What If Oxygen Disappears: फक्त 5 सेकंदासाठी पृथ्वीवरून ऑक्सिजन गायब झाला तर? जगण्याची कल्पना करणंच अशक्य!

0
What If Oxygen Disappears: फक्त 5 सेकंदासाठी पृथ्वीवरून ऑक्सिजन गायब झाला तर? जगण्याची कल्पना करणंच अशक्य!
फक्त 5 सेकंदासाठी पृथ्वीवरून ऑक्सिजन गायब झाला तर? फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: मनुष्याला ज्या प्रमाणे, पाणी आणि अन्नाची गरज असते, त्या प्रमाणेच हवेची सुद्धा गरज असते. हवेच्या माध्यमातूनच मनुष्य श्वास घेतो. आपण सर्वजण ऑक्सिजनला जीवनाचा आधार मानतो. श्वास घेण्यासाठी गॅसची जितकी आवश्यकता आहे, त्याप्रमाणेच पृथ्वीच्या अस्तित्वासाठीही त्याची आवश्यकता आहे. अनेकदा आपल्या मनात एक प्रश्न हमखास येतो, तो म्हणजे, काही क्षणांसाठी हवेतून ऑक्सिजन नाहीसा झाला तर? अनेकांना वाटतं की, 5 सेकंदांसाठी श्वास रोखून धरला तर काहीही होत नाही, त्यामुळे जगावर त्याचा कोणताही मोठा परिणाम होणार नाही. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. जर पृथ्वीवरून 100% ऑक्सिजन केवळ 5 सेकंदांसाठी जरी नाहीसा झाला, तर संपूर्ण जगात असा विनाश होईल की, त्याची कल्पना करूनही अंगावर काटा येईल.

https://www.prahaar.in/2026/11/01/a-gift-of-34-ac-electric-buses-for-chhatrapati-sambhajinagar-inaugurated-by-chief-minister-fadnavis/

ऑक्सिजनचा वापर केवळ श्वास घेण्यासाठीच केला जात नाही, तर त्याचा वापर काँक्रिटच्या बांधकामांसाठी एक अत्यावश्यक जोडणारा घटक म्हणूनही पाहिले जाते. ऑक्सिजनशिवाय, आपल्या आजुबाजुच्या गगनचुंबी इमारती, धरणे, पूल आणि काँक्रीटच्या बांधकामांची ताकद नाहीशी होईल. ऑक्सिजन अचानक नाहीसा झाल्यास काँक्रीटचे कण एकमेकांपासून वेगळे होतील आणि जगातील सर्व ऐतिहासिक वास्तू, उंच इमारती आणि पायाभूत सुविधा एका क्षणात धुळीत मिळतील. केवळ 5 सेकंद अख्ख जग होत्याचं नव्हतं होऊन जाईल. हा विचार करणं सुद्धा अंगावर शहारे आणतो.

हवेतील ऑक्सिजन सूर्यप्रकाश मनुष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतो. नाही तर, आकाश पूर्णपणे काळे होईल आणि दिवसासुद्धा गडद अंधार होईल. यामुळे आपल्या सभोवतालच्या वातावरणाच्या दाबात अचानक 21 टक्क्यांची मोठी घट होईल. हवेच्या दाबातील या जलद बदलामुळे मानव आणि इतर प्राण्यांच्या कानाच्या आतील भागावर प्रचंड दाब पडेल, ज्यामुळे प्रत्येक सजीवाचे कानाचे पडदे त्वरित फाटण्याची शक्यता आहे. हवेतील ऑक्सिजनच्या कमतरतेचा वाहनांवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वाहनामध्ये ऑईल असतं, त्यामुळे आपलं वाहन चालतं. आपलं वाहन सुरू होण्यासाठी जितकी ऑईलची आवश्यकता आहे, तितकीच ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता आहे.

https://www.prahaar.in/2026/11/01/central-government-releases-additional-instalment-of-tax-devolution-of-rs-1-09-lakh-cr-to-states/

रस्त्यावरील गाडी असो किंवा पाण्यावर तरंगणारे जहाज किंवा आकाशात उडणारे विमान… जर ऑक्सिजन गायब झाला तर, या सर्वांची इंजिने पूर्णपणे बंद पडतील. परिणामी, आकाशात उडणारी हजारो विमाने जमिनीवर कोसळतील आणि रस्त्यावरील वाहने अचानक थांबतील, ज्यामुळे जगभरात भीषण अपघात घडण्याची शक्यता आहे. ओझोनचा थर, जो पृथ्वीचे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करतो, तो पूर्णपणे ऑक्सिजनच्या रेणूंनी बनलेला आहे. जर ऑक्सिजन नाहीसा झाला, तर ओझोनचा थर त्वरित नष्ट होईल. तो नाहीसा झाला तर, सूर्याची तीव्र किरणे थेट पृथ्वीवर पोहोचतील आणि लोकांची त्वचा गंभीरपणे भाजेल. शिवाय, पाण्याचे रासायनिक सूत्र H2O आहे, ज्यात एक भाग ऑक्सिजन आणि दोन भाग हायड्रोजन असतात.

ऑक्सिजन नाहीसा झाल्यास, पाणी त्वरित अत्यंत ज्वलनशील हायड्रोजन वायूमध्ये रूपांतरित होईल, ज्यामुळे जगभरातील महासागर आणि नद्यांचे बाष्पीभवन होईल किंवा स्फोट होईल. थोडक्यात, जरी एखाद्या व्यक्तीने पाच सेकंदांसाठी आपला श्वास रोखून धरला, तरी पृथ्वीची भौगोलिक आणि भौतिक रचना पूर्णपणे नष्ट होईल. त्यामुळे फक्त ह्याचा विचार करणंच शक्य आहे, प्रत्यक्षात घडलं तर जगावर मोठं संकट येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here