Home महाराष्ट्र नाशिक Nashik : नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 31 ऑक्टोबरपर्यंत ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ घोषित

Nashik : नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 31 ऑक्टोबरपर्यंत ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ घोषित

0
Nashik : नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 31 ऑक्टोबरपर्यंत ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ घोषित

Nashik : कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) (सी) अन्वये नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण परिसर हा सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधीत क्षेत्र व ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ (No Drone Fly Zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्षेत्रात ड्रोन उडविण्यास २९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंध लागू राहणार आहे. या क्षेत्रात ड्रोन उडविणे, ड्रोनद्वारे छायाचित्रण किंवा चित्रीकरण करणे तसेच ड्रोनचा वापर करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.

संभाव्य धोखा लक्षात घेता निर्णय

नाशिक शहरातील रामकुंड, गोदाघाट परिसर तसेच देवमामलेदार मंदिर येथे ड्रोन हल्ल्यांच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ड्रोनचा वापर करून घडविण्यात आलेल्या विविध हल्ल्यांच्या घटनांचा विचार करता, सार्वजनिक सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि संभाव्य धोके टाळणे आवश्यक असल्याने हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.

https://www.prahaar.in/2026/10/27/nashik-kumbhmela-a-season-of-religious-and-cultural-festivities-in-shik-a-grand-cultural-procession-on-october-30th-and-a-religious-flag-hoisting-ceremony-on-october-31st/

…तर कारवाई होणार

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रतिबंधित परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉटएअर बलून्स, मायकोलाइट एअरक्राफ्ट तसेच तत्सम हवाई साधनांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय अशा साधनांचे उड्डाण किंवा वापर करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम, भारतीय विमान अधिनियम 1934 व तसेच अन्य प्रचलित कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त कर्णिक यांनी आदेशात नमुत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here