Home एक्सक्ल्युजिव्ह Vidhan Parishad Election Result : नागपूर, अमरावती, पुण्यावर महायुतीचा झेंडा! विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, उबाठाचा सुफडा साफ

Vidhan Parishad Election Result : नागपूर, अमरावती, पुण्यावर महायुतीचा झेंडा! विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, उबाठाचा सुफडा साफ

0
Vidhan Parishad Election Result : नागपूर, अमरावती, पुण्यावर महायुतीचा झेंडा! विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, उबाठाचा सुफडा साफ

भाजप २, शिवसेना १, शरद पवार गटाला २ जागा

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या निवडणुकीत महायुतीने तीन जागा जिंकत वर्चस्व मिळवले, तर महाविकास आघाडीला दोन जागांवर समाधान मानावे लागले. नागपूर आणि पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. तर, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने बाजी मारली. पुणे शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाची जागा शरद पवार गटाने जिंकली. याउलट काँग्रेस आणि उबाठाला एकही जागा मिळवता आली नाही.

https://www.prahaar.in/2026/10/28/national-central-employees-da-hike-by-3-percentage-big-news-for-pensioners-news/

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे यांनी विजय मिळवला. या मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नितेश कराळे आणि शिक्षक भारतीचे अतुल देशमुख यांच्याशी त्यांची लढत झाली. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले. त्यांच्याविरोधात शिंदे यांच्या शिवसेनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर मैदानात होते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले.

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक यांनी विजय मिळवला. काँग्रेसच्या अदिती पोहरे, अपक्ष संगीता शिंदे आणि उबाठाचे दत्तात्रय लहाने यांच्याशी त्यांची लढत झाली. या विजयामुळे महायुतीच्या खात्यात शिवसेनेची एक जागा जमा झाली. दुसरीकडे, पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातही याच पक्षाचे प्रतापसिंग पाटील विजयी झाले. त्यामुळे महाविकास आघाडीला मिळालेल्या दोन जागांमध्ये शरद पवार गटाचा वाटा राहिला. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंतील बंडखोरीमुळे राजकीय चुरस निर्माण झाली होती. सुमारे ३० तास चाललेल्या मतमोजणीनंतर पाचही जागांचे निकाल स्पष्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here