Home महाराष्ट्र कोकण भारताच्या पहिल्या सिंधुदुर्गातील अंडरवॉटर म्युझियम प्रकल्पाचा गौरव, ‘आयएनएस गुलदार’ला पुरस्कार

भारताच्या पहिल्या सिंधुदुर्गातील अंडरवॉटर म्युझियम प्रकल्पाचा गौरव, ‘आयएनएस गुलदार’ला पुरस्कार

0
भारताच्या पहिल्या सिंधुदुर्गातील अंडरवॉटर म्युझियम प्रकल्पाचा गौरव, ‘आयएनएस गुलदार’ला पुरस्कार
भारताच्या पहिल्या सिंधुदुर्गातील अंडरवॉटर म्युझियम प्रकल्पाचा गौरव फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या पर्यटन विभागाचा सन्मान करण्यात आला आहे. पर्यटन विभागांतर्गत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) महत्वाकांक्षी ‘आयएनएस गुलदार’ या प्रकल्पाला प्रतिष्ठेचा ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड– गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड 2026’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ, पाणबुडी पर्यटन प्रकल्प विकसित होत असल्यामुळे या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/28/nashik-no-drone-fly-zone-declared-within-the-jurisdiction-of-the-nashik-police-commissionerate-until-october-31/

‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड- गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड 2026’ या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम प्रधानमंत्री संग्रहालय आणि ग्रंथालय नवी दिल्लीमध्ये 27 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार, केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांनी हा पुरस्कार घेतला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने, अधिक्षक अभियंता संजय पाटील, ॲक्वाटिक टूरझिमच्या वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र सोनावणे आदी उपस्थित होते.

https://www.prahaar.in/2026/10/28/mahayuti-triumphs-in-nagpur-amravati-and-pune-congress-and-ubt-uddhav-balasaheb-thackeray-faction-completely-wiped-out-in-legislative-council-elections/

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर, राज्याचे पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ” ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड’ अंतर्गत मिळालेला ‘गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड 2026’ हा सन्मान महाराष्ट्राच्या पर्यटन विकासातील महत्वाचा टप्पा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर गौरविणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. ‘आयएनएस गुलदार’ हा प्रकल्प पर्यटनाच्या पारंपरिक संकल्पनेपलीकडे जाऊन आधुनिक पर्यटन अनुभव यांची सांगड घालणारा महत्वपूर्ण उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी दिशा मिळेल. हा पुरस्कार मिळवण्यासाठी योगदान देणार्‍या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो.”

https://www.prahaar.in/2026/10/28/proposal-for-230-crore-rupees-memorial-for-mahatma-phule-in-pune-approved-decision-taken-at-a-meeting-of-the-cabinet-sub-committee-on-obc-affairs/

पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या समन्वयाने, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार हा देशातील अत्यंत महत्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटन प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातंर्गत, ‘स्पेशल असिस्टंस टू स्टेटस फॉर कॅपीटल इन्हव्हेस्टमेंट डेव्हलपमेंट ऑफ आयकॉनिक टुरिस्ट सेंटर्स टू ग्लोबल स्केल’ या योजनेअंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासनाव्दारे विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 46.91 कोटी तर महाराष्ट्र शासनाने ₹112.46 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/28/cm-devendra-fadnavis-launches-mahadbt-2-0-portal-allowing-fishermen-to-apply-online-for-24-schemes/

एक्स-आयएनएस गुलदार ही भारतीय नौदलातील ‘मगर’ वर्गातील लँडिंग शिप टँक प्रकारातील युद्धनौका असून ही नौका तब्बल 39 वर्षे राष्ट्रसेवा बजावून 12 जानेवारी 2024 रोजी भारतीय नौदलामधून निवृत्त झाली. ही नौका मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या माध्यमातून 19 मे 2026 रोजी सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील निवती रॉक परिसरात सुमारे 22 मीटर खोलीवर समुद्रतळावर ठेवण्यात आली. एक्स-आयएनएस गुलदारची मजबूत पोलादी रचना आता कृत्रिम प्रवाळभिंत्ती म्हणून कार्य करणार असून त्यामुळे समुद्री जैवविविधता, प्रवाळ वाढ, मासेमारी संसाधने आणि पर्यावरणीय संतुलनास चालना मिळणार आहे. जेट्टीवरुन स्पीडबोटद्वारे निवती रॉक येथे पोहोचून आणि तेथील बार्जवर उतरुन पाणबुडी किंवा स्कूबाव्दारे जहाजामधील प्रवाळ व मत्स्य पाहणी पर्यटकांना करता येणार आहे. यामध्ये व्रेक डायव्हिंग व सबमरीन अनुभव, डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग (12 मीटरपर्यंत), प्रमाणित डायव्हर मोहिमा (18 मीटरपर्यंत), अॅडव्हान्स डायव्हिंग अनुभव (30 मीटरपर्यंत), अंडरवॉटर फोटोग्राफी पर्यटन, सागरी शिक्षण व संशोधन करता येणार आहे. फ्लोरिडा (अमेरिका) येथील युएसएस ऑरिस्कन आणि ऑस्ट्रेलियातील एचएमएएस स्वॅन यांसारख्या जागतिक दर्जाच्या व्रेक डायव्हिंग स्थळांपासून प्रेरणा घेत विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प भारतातील पहिला जागतिक स्तरावरील अंडरवॉटर म्युझियम आणि कृत्रिम प्रवाळभित्ती पर्यटन उपक्रम ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here