Home ब्रेकिंग न्यूज ‘कॉकरोच’ माझे आदर्श नाहीत म्हणत उबाठा गटाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याचा राजीनामा

‘कॉकरोच’ माझे आदर्श नाहीत म्हणत उबाठा गटाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याचा राजीनामा

0
‘कॉकरोच’ माझे आदर्श नाहीत म्हणत उबाठा गटाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याचा राजीनामा
‘कॉकरोच’ माझे आदर्श नाहीत म्हणत उबाठा गटाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याचा राजीनामा

मुंबई : उबाठा गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपली मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप करत, हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर मोकळेपणाने बोलता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘कॉकरोच माझे आदर्श नाहीत,’ असे म्हणत त्यांनी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/12/sunetra-pawar-retains-absolute-control-over-someshwar-sugar-factory/

2019 पासून आपण बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानून प्रामाणिकपणे काम केले. मात्र, आता पक्षात आपले विचार मांडण्यावर मर्यादा येत असल्याचा आरोप दुबे यांनी केला. ध्रुव राठी आणि इमाम हे आपले आदर्श नसून स्मित मच्छार हे आदर्श असल्याचे सांगताना, त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून एक पोस्टही केली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘हे कॉकरोच आमचे आदर्श कसे होऊ शकतात, हे ठरविण्याचा अधिकार कोणाला?’ असा सवालही त्यांनी केला.

महागाईसारख्या मुद्द्यांवर विरोधकांनी आवाज उठवावा; मात्र संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिगत हल्ले टाळले पाहिजेत, असे मत दुबे यांनी मांडले. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते एकत्र चहा घेत असल्याचे फोटो दिसत होते; मात्र आता राजकारणात कटुता वाढल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आपल्याला पक्षातून काढल्याचे बनावट पत्र प्रसारित झाले, तरी पक्षाने त्याचे खंडन केले नाही आणि आपल्यालाच खुलासा करावा लागला, असा आरोप दुबे यांनी केला. पक्षाची विचारधारा आणि सध्याची दिशा यांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आपण अद्याप कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही; योग्य संधी मिळाल्यास विचार करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here