Home क्रीडा षटकार मारताच.! भारताच्या या गोलंदाजाला टी20 क्रिकेटमध्ये सिक्स मारण्यापूर्वी जरा सांभाळूनच,अन्यथा…

षटकार मारताच.! भारताच्या या गोलंदाजाला टी20 क्रिकेटमध्ये सिक्स मारण्यापूर्वी जरा सांभाळूनच,अन्यथा…

0
षटकार मारताच.! भारताच्या या गोलंदाजाला टी20 क्रिकेटमध्ये सिक्स मारण्यापूर्वी जरा सांभाळूनच,अन्यथा…
षटकार मारताच.! भारताच्या या गोलंदाजाला टी20 क्रिकेटमध्ये सिक्स मारण्यापूर्वी जरा सांभाळूनच,अन्यथा... (Photo: ANI)

टी20 क्रिकेट हे फलंदाजांचं क्रिकेट असं क्रीडाप्रेमी म्हणतात. त्याला कारणंही तसंच आहे. कारण या फॉर्मेटमध्ये गोलंदाजांची तशी काही किंमत नसते.चेंडू आला की थेट सीमेपार पाठवण्याची ताकद फलंदाज ठेवतात. त्यामुळे गोलंदाजांचं मरण असतं. पण हा फंडा टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू नमन धीरविरुद्ध वापरणं कठीण जातं. नमन धीरने नुकतंच टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. अष्टपैलू खेळाडू असल्याने श्रेयस अय्यरचा त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे. त्याचा गोलंदाजीसाठी योग्य त्या ठिकाणी वापर करत आहे. असं असताना त्याने तीन सामन्यातच आपल्या गोलंदाजीचा प्रभाव टाकला आहे. या गोलंदाजाला षटकार मारणं फलंदाजांना महागात पडतं. तीन सामन्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर असंच म्हणावं लागेल. म्हणजेच या गोलंदाजाला षटकार मारताना फलंदाजाला 100वेळा विचार करणं भाग आहे. कसं काय ते आकडेवारीवरून समजून घ्या.

तीन टी20 सामन्यात 5 विकेट, पण पॅटर्न एकच

अष्टपैलू नमन धीर याने वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिकेतून पदार्पण कें. त्याने पहिला टी20 साममना लखनौमध्ये खेळला. या सामन्यात त्याने तीन विकेट काढल्या. तर दुसऱ्या टी20 सामन्यात त्याला विकेट काढता आली नाही. इंदुरमधील तिसऱ्या टी20 सामन्यात त्याने 2 विकेट काढल्या. म्हणजे तीन टी20 सामन्यात त्याने पाच विकेट काढल्या. नमन धीरने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काढलेल्या पाचही विकेट खास आहेत. त्याने पाचही विकेट षटकार मारल्यानंतर काढल्या आहेत. फलंदाजाने षटकार मारल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर विकेट काढली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/12/arshdeep-singh-publicly-apologized-to-axar-patel-for-the-run-out-in-ind-vs-wi-3rd-t20-match/

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात शे होपने नमन धीर टाकत 12षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला. पण चौथ्या चेंडूवर नमन धीरने त्याची विकेट काढली. त्यानंतर 14व्या षटकाच्या पहिल्या षटकावर रोमारियो शेफर्डने षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यांतर 16 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शमर स्प्रिंगरने षटकार मारला. त्याची विकेट पाचव्या चेंडूवर काढली. हाच पॅटर्न इंदुर टी20 सामन्यात पाहायला मिळाला.

इंदुरमध्ये खेळलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात नमन धीरने दोन विकेट काढल्या. या दोन्ही विकेट अशाच पद्धतीने काढल्या. सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हेटमायरने विकेट काढली. त्यानंतर या सहाव्या चेंडूवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला. हीच चूक कामिल पूरनने केली. त्याने 11 षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार मारला आणि पुढच्या चेंडूवर त्याची विकेट काढली. त्यामुळे नमन धीरला षटकार मारताना जरा जपूनच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here