Home महाराष्ट्र नवी मुंबई Navi Mumbai News: नवी मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा कहर, शहरात डेंग्यू-मलेरियाचे किती रूग्ण? आकडेवारी जाहीर

Navi Mumbai News: नवी मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा कहर, शहरात डेंग्यू-मलेरियाचे किती रूग्ण? आकडेवारी जाहीर

0
Navi Mumbai News: नवी मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा कहर, शहरात डेंग्यू-मलेरियाचे किती रूग्ण? आकडेवारी जाहीर
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

नवी मुंबई: नवी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईतील तळोजा परिसरामध्ये डेंग्यु आणि मलेरियाच्या रूग्णांची झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये साथीचे आजार डोकं वर काढताना पाहायला मिळते. अस्वच्छता, न वाहतं पाणी यांसह अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे साथीचे आजार नागरिकांना होताना दिसतात. नवी मुंबईतील तळोजाच्या शहरी आणि ग्रामीण परिसरामध्ये दुर्गंधीमुळे अनेक नागरिकांना डेंग्यु आणि मलेरियाची लागण झालेले पाहायला मिळत आहे.

https://www.prahaar.in/2026/09/30/navratri-health-awareness-drive-chief-minister-health-dialogue-youth/

गेल्या काही महिन्यांपासून, तळोजा शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे वेगाने विकसित होणाऱ्या या परिसरामध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांविषयी नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जून ते ऑगस्ट दरम्यान डेंग्यू आणि मलेरियाचे 20 रुग्ण आढळून आले आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत तपासलेल्या 183 डेंग्यू संशयित रुग्णांपैकी आठ जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे, 4103 रहिवाशांची मलेरिया चाचणी करण्यात आली, त्यापैकी 12 जणांना मलेरियाची लागण झाल्याचे आढळून आले, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

https://www.prahaar.in/2026/09/30/cooperation-department-has-taken-a-significant-decision-to-curb-arbitrariness-in-the-redevelopment-process-of-cooperative-housing-societies/

नवी मुंबईतील तळोजामध्ये झपाट्याने विकासकामे होताना पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिक या परिसरामध्ये स्थलांतरित होताना दिसत आहेत. तळोजाचा झपाट्याने होणारा विस्तार, मोठ्या प्रमाणावरील बांधकाम, अनेक ठिकाणी साचलेले पाणी आणि अस्वच्छता यांमुळे साथीचे आजार डोकं वर काढताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येताना दिसत आहे. त्यामुळे तळोजाच्या शहरी आणि ग्रामीण परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अधिक तीव्र निगराणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी बांधकाम स्थळांवर पाणी साचू नये याची खात्री करणे, गटारे- नाले नियमितपणे स्वच्छ करणे, डासांच्या प्रजननाची ठिकाणे नष्ट करणे, धूर फवारणी आणि कीटकनाशक फवारणी करणे या कामावर महापालिकेकडून विशेष लक्ष दिले जात आहे.

https://www.prahaar.in/2026/09/30/cement-road-works-halted-due-to-drought-district-planning-funds-to-be-used-solely-for-water-supply-and-drought-relief/

इतकंच नाही तर, रोगांचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून जनजागृती मोहीम देखील राबवली जात आहे. “डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मोहिमा राबवल्या जात आहेत. रुग्णांची माहिती गोळा करण्यासाठी आरोग्य कर्मचारी आणि निरीक्षक खासगी रुग्णालयांनाही भेटी देत ​​आहेत. जिथे जिथे रुग्ण आढळले आहेत, तिथे तापाची पाहणी, धूर फवारणी आणि कीटकनाशक फवारणी केली जात आहे,” असे पनवेल महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here