Home ब्रेकिंग न्यूज सुट्टीच्या काळात प्रवाशांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून मुंबई – मडगांव आणि मुंबई – नागपूर दरम्यान 8 विशेष गाड्यांची घोषणा

सुट्टीच्या काळात प्रवाशांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून मुंबई – मडगांव आणि मुंबई – नागपूर दरम्यान 8 विशेष गाड्यांची घोषणा

0
सुट्टीच्या काळात प्रवाशांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून मुंबई – मडगांव आणि मुंबई – नागपूर दरम्यान 8 विशेष गाड्यांची घोषणा
मध्य रेल्वेकडून मुंबई - मडगांव आणि मुंबई - नागपूर दरम्यान 8 विशेष गाड्यांची घोषणा(Photo:AI generated)

मुंबई : सणासुदीच्या आणि सुट्टीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने मुंबई ते मडगांव आणि मुंबई ते नागपूर दरम्यान एकूण 8 साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकण आणि विदर्भाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

1. लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगांव साप्ताहिक विशेष गाड्या (4 सेवा)

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एलटीटी ते मडगांव दरम्यान एकूण ४ फेऱ्यांच्या विशेष गाड्या धावणार आहेत.

गाडी क्रमांक 01029 विशेष गाडी: ही गाडी दिनांक 02.10.2026 (शुक्रवार) आणि 04.10.2026 (रविवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री 00.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 15.15 वाजता मडगांव येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 01030 विशेष गाडी: ही गाडी दिनांक 02.10.2026 आणि 04.10.2026 रोजी मडगांव येथून दुपारी 16.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 03.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

प्रमुख थांबे: ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी या स्थानकांवर थांबेल.

2. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर सुपरफास्ट विशेष गाड्या (4 सेवा)

विदर्भाच्या प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर दरम्यान 4 सुपरफास्ट विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

गाडी क्रमांक 02141 विशेष गाडी: ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 02.10.2026 आणि 04.10.2026 रोजी सीएसएमटी येथून 00.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 15.35 वाजता नागपूर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 02142 विशेष गाडी: ही गाडी नागपूर येथून दिनांक 02.10.2026 आणि 04.10.2026 रोजी दुपारी 16.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 09.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

प्रमुख थांबे: या गाडीचे दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी (केवळ गाडी क्र. 02142 साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असणार आहेत.

https://www.prahaar.in/2026/09/30/7-year-old-anamika-mishra-run-30km-on-2nd-october-gandhi-jayanti-in-uttar-pradesh-gonda/

ट्रेनची संरचना आणि आरक्षण कधीपासून?

या दोन्ही विशेष गाड्यांच्या संरचनेत 4 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 11 शयनयान (स्लीपर), 5 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन असणार आहेत.

विशेष गाडी क्रमांक 01029, 02141 आणि 02142 साठीचे आरक्षण दिनांक 01.10.2026 रोजीपासून सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर www.irctc.co.in उपलब्ध होईल. तसेच सामान्य दरांसह अनारक्षित डब्यांचे तिकीट UTS प्रणालीद्वारे काढता येईल. प्रवासी तिकिटांच्या सुलभ बुकिंगसाठी ‘रेलवन’ ॲप देखील डाऊनलोड करू शकतात. गाड्यांच्या वेळा व थांब्यांसंबंधी अधिक माहितीसाठी नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टम www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी, असे रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here