Home महाराष्ट्र नाशिक Nashik Breaking news: उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानासोबत ‘हे’ देवस्थान दर्शनासाठी बंद राहणार

Nashik Breaking news: उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानासोबत ‘हे’ देवस्थान दर्शनासाठी बंद राहणार

0
Nashik Breaking news: उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानासोबत ‘हे’ देवस्थान दर्शनासाठी बंद राहणार

Nashik Rain Update :  राज्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुढील काही तासासाठी रेड अलर्ट जारी केला. नाशिक जिल्ह्यात पुढील ४८ तासांत ढगफुटीसदृश मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, काही ठिकाणी ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.

https://prahaar.in/2026/07/06/torrential-rain-causes-major-flooding-in-the-indrayani-river-all-four-lakes-feeding-towards-alandi-are-overflowing/

त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि सप्तशृंगी देवस्थान दर्शनासाठी बंद

उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानासोबत सप्तशृंगी देवस्थान दर्शनासाठी बंद राहणार आहे. आज त्र्यंबकेश्वरमध्ये संध्याकाळी पूजा झाल्यानंतर बुधवारीच पूजा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हवामान विभागाचा अंदाज बघून बुधवारबाबाबत अंतिम निर्णय होईल अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

सप्तशृंगी गड येथे ५०० मिमी पावसाचा अंदाज आहे त्यामुळे गर्दी होऊ नये या पार्श्वभूमीवर तसेच संभाव्य धोखा लक्षात घेता दोन्ही देवस्थान बंद ठेवण्यात येणार आहे. असा निर्णय नाशिक प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि सप्तशृंगी देवस्थान याठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी येऊ नये असे आवाहन देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

https://prahaar.in/2026/07/06/chance-of-cloudburst-like-rain-in-nashik-in-the-next-48-hours/

उद्या नाशिकमध्ये ढगफुटीसदृश पावसाची शक्यता

मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाशिकबाबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले आहेत की, उद्या नाशिकला अलर्ट आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भागात उद्या ढगफुटी संभावित आहे. उद्या त्या भागात 300 एमएमचा पाऊस पडू शकतो. उद्या तिथे प्रशासकीय पातळीवर योग्य ती खबरदारी घेत आहोत, उपाययोजना करत आहोत. 8 तारखेपर्यंत सातत्याने हे सगळे अलर्ट्स देण्यात आलेले आहेत. (Nashik Rain Update)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here