Home महाराष्ट्र नाशिक Nashik Rain Update : नाशिकमध्ये आभाळ फाटणार, जिल्हाधिकाऱ्यांचे तडकाफडकी पाच मोठे निर्णय ; शाळा कॉलेजबाबतही मोठा निर्णय

Nashik Rain Update : नाशिकमध्ये आभाळ फाटणार, जिल्हाधिकाऱ्यांचे तडकाफडकी पाच मोठे निर्णय ; शाळा कॉलेजबाबतही मोठा निर्णय

0
Nashik Rain Update : नाशिकमध्ये आभाळ फाटणार, जिल्हाधिकाऱ्यांचे तडकाफडकी पाच मोठे निर्णय ; शाळा कॉलेजबाबतही मोठा निर्णय
heavy rain

Nashik Rain Update : राज्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही तासासाठी रेड अलर्ट जारी केला. नाशिक जिल्ह्यात पुढील ४८ तासांत ढगफुटीसदृश मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, काही ठिकाणी ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.

https://prahaar.in/2026/07/06/chance-of-cloudburst-like-rain-in-nashik-in-the-next-48-hours/

पाऊस धो धो कोसळणार

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक, पेठ, दिंडोरी या तालुक्यात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. कळवण, सटाणा या भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. परंतु अतिमुसळधार पाऊस, कमी कालावधित जास्त पाऊस हा त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक शहराच्या पश्चिम भागात होणार आहे. याच तिन्ही भागात ढगफुटी होण्याची शक्यता आहे. ढगफुटीची संभाव्य धोखा लक्षात घेता नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खबरदारी घेत मोठा निर्णय घेतला आहे.

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज (7 जुलै) पत्रकार परिषद घेऊन ढगफुटीसारख्या संकटाला तोंड देण्यासाठी नेमके काय काय नियोजन केले आहे, याची सविस्तर माहिती दिली आहे. हवामानाचा ताजा अंदाज समोर येईल तेव्हा आपल्याला कोणत्या भागात जास्त लक्ष देण्याची गरज आहे, ते लक्षात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी एक बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांनी सर्व अनुषंगाने नियोजन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या निर्देशानुसार आम्ही काही नियोजन केलेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

https://prahaar.in/2026/07/06/hit-by-heavy-rains-traffic-on-the-mumbai-goa-highway-disrupted-rescue-operations-underway-by-the-administration/

त्र्यंबकेश्वर मंदिर बंद

त्र्यंबकेश्वर देवस्थान परवापर्यंत बंद असेल. आज संध्याकाळची सूर्यास्त झाल्यानंतर पूजा होईल. परवापर्यंत हे मंदिर बंद असेल. ज्या भाविकांना उद्या मंदिरात येऊन दर्शन घ्यायचे होते, त्यांनी त्र्यंबकेश्वरला येणे टाळावे. त्या भागात मोठ्या प्रमाणात बांधकामही सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये. उद्याच्या दिवस सप्तशृंगी देवीचे दर्शनही बंद असेल. ज्या-ज्या गावात पूर येण्याची शक्यता आहे, त्यांचीही यादी तयारी केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

https://prahaar.in/2026/07/06/navanath-ban-not-ramraksha-but-paksharaksha-party-protection-is-underway-navanath-ban-launches-a-scathing-attack-on-sanjay-raut/000000000000

नाशिक जिल्ह्यात शाळा कॉलेज अन आठवडी बाजार बंद

तसेच, उद्या म्हणजेच 7 जुलै रोजी नाशिक शहर वगळून नाशिक तालुक्याचा ग्रामीण भाग, त्र्यंबकेश्वर तालुका, इगतपुरी तालुका या तीन तालुक्यातील आठवडी बाजार बंद असतील. 7 जुलै रोजी या भागातील सर्व शाळा, कॉलेजेस बंद असतील. उद्या जोराचा पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनीही शेतात जाण्याचे टाळावे. अतिआवश्यक नसेल तर उद्या प्रवास टाळावा. आपण काही रस्ते बंद करणार आहोत. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे, ते रस्ते बंद केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. या रस्त्यांची यादी पीडब्ल्यूडी विभाग, पोलीस, राष्ट्रीय महामार्गाच्या मदतीने केली जाईल. हे रस्ते बंद झाल्यामुळे त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येईल. कारण नसताना बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here