मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या शेजारी, मटन मार्केटजवळ ही घटना घडली. (Bhendi Bazaar Fire)
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, भूमिगत केबलमधून धूर आणि आगीच्या ठिणग्या बाहेर येऊ लागल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आली. मात्र, सुमारे अर्धा ते पाऊण तास कोणतीही आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. (Bhendi Bazaar Fire)
https://prahaar.in/2026/06/28/rohit-shetty-receives-another-death-threat-extortion-demand-of-%e2%82%b920-crore-investigation-looks-into-bishnoi-gang-connection/
आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. कोणताही मोठा अपघात होऊ नये म्हणून नागरिकांनी स्वतःहून परिसरातील लोकांना सुरक्षित अंतरावर राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर अग्निशमन दल आणि संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (Bhendi Bazaar Fire)
https://prahaar.in/2026/06/28/bhiwandi-fire-massive-blaze-on-the-mumbai-nashik-highway-several-shops-along-with-warehouses-storing-tyres-and-wood-engulfed-in-flames/
या घटनेमुळे काही काळ परिसरातील वीज आणि दळणवळण सेवांवर परिणाम झाल्याची शक्यता असून, संबंधित यंत्रणा नुकसानाचे मूल्यांकन करत आहेत. स्थानिक नागरिकांनी अशा घटनांमध्ये आपत्कालीन यंत्रणांनी अधिक तत्परतेने प्रतिसाद देण्याची मागणी केली आहे. (Bhendi Bazaar Fire)
View this post on Instagram