Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

0
Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह नगरसेवक, अधिकाऱ्यांसाठी अपुरे पडत असल्याने नवे सभागृह उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागी चार मजली इमारत उभारली जाणार असून त्यात वरच्या मजल्यावर हे सभागृह साकारण्याचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे.३५० क्षमता, नगरसेवक (Corporator),अधिकारी (Officer), पत्रकारांसाठी व्यवस्था, विविध सुविधांनी युक्त असे हे सभागृह असेल. ऑगस्टमध्ये कामाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे. नवे सभागृह उपलब्ध होताच, जुन्या ऐतिहासिक वास्तू असलेल्या सभागृहाचा वापर महापौरांच्या बैठकीसाठी करण्याचे नियोजनही आहे. सध्याच्या सभागृहात २२७ नगरसेवक आणि दहा स्वीकृत नगरसेवकांसाठी आसनव्यवस्था आहे. त्या व्यतिरिक्त महापालिका कर्मचारी, पत्रकार यांना उभे राहता येईल, अशी काही प्रमाणात जागा आहे. मात्र ही जागा अपुरी पडत असल्याने नवे सभागृह बांधण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली.

https://prahaar.in/2026/06/27/air-quality-monitoring-air-quality-monitoring-stations-to-be-set-up-at-five-locations-in-mumbai/

मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागेत नवे सभागृह असावे, यासाठी भाजप आग्रही आहे. या जागी टाऊनहॉल, जिमखान्याचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. हा प्रस्ताव स्थायी समितीने नुकताच फेटाळला. त्यामुळे जिमखान्याच्या जागेवर सभागृह उभारणीचा मार्ग मोकळाही झाला. आता सुधारित आराखडा तयार करून नवीन सभागृह उभारणीचे नियोजन मुंबई महापालिकेने केले आहे. यामध्ये जिमखानाही असेल. सध्याचे सभागृह आतून साधारण ५० फूट उंच आहे. नवीन सभागृहाची आतून उंची ३० ते ४० फूट असेल. हा प्रस्ताव तयार करून त्याची लवकरच स्थायी समितीकडून मंजुरी घेतली जाणार आहे.

https://prahaar.in/2026/06/27/badminton-asia-junior-championships-india-storms-into-the-quarter-finals-after-defeating-kazakhstan/
नवीन सभागृहात काय?

नवीन सभागृह चार मजली असेल. खाली क्रीडासंकुल, त्यावर पार्किंग व्यवस्था.त्यावरील मजल्यावर नगरसेवक, आयुक्त, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांचे चेंबर.सर्वांत वर सभागृह असेल. यामध्ये नगरसेवक, अधिकारी व पत्रकार बसू शकतील अशी व्यवस्था.८० वाहनांसाठी पार्किंगची जागा असेल.जुन्या महापालिका इमारतीतून नव्या सभागृहाच्या इमारतीत जाण्यासाठी पुलाची जोडसत्ताधारी, विरोधकांसाठी स्वतंत्र लिफ्ट, जिने नवीन सभागृहात महापौर, सत्ताधारी, विरोधक आणि सामान्यांसाठी चार लिफ्ट असतील, तर दोन जिने असतील. यामध्ये एक सत्ताधारी व विरोधकांसाठी असेल, अशी माहिती खणकर यांनी दिली. महापौरांना बैठकांसाठी स्वतंत्र दालन नाही. त्यामुळे त्यांच्या बैठका स्थायी समिती किंवा सुधार समितीच्या सभागृहात होत आहेत, ते म्हणाले.

https://prahaar.in/2026/06/27/good-news-for-mumbaikars-12-new-ac-local-trains-to-run-on-the-central-railway-line-timetable-released/

“मुंबई महापालिका नवीन सभागृह उभारणार पूर्वी टाऊनहॉल उभारणीसाठी निविदा काढण्यात आली होती. त्यात सुधारणा करून याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. त्याची स्थायी समितीत मंजुरी घ्यावी लागणार आहे. नवीन सभागृहाचा आराखडाही तयार झाला असून हे सभागृह आताच्या सभागृहासारखेच वारसास्थळासारखे असेल.”- डॉ. अविनाश ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

https://prahaar.in/2026/06/27/a-journey-that-used-to-take-30-to-40-minutes-will-now-take-just-15-minutes-kalyan-shilphata/

“सध्याच्या ऐतिहासिक 66 सभागृहातील जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन सभागृह असावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नवीन सभागृहाचा नकाशा, आराखडा तयार झाला आहे. महिनाभरात यावर अंतिन निर्णय होईल आणि ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भूमिपूजन केले जाईल.”- गणेश खणकर, सभागृह नेते, मुंबई महापालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here