Home क्रीडा Badminton Asia Junior Championships : कझाकिस्तानवर मात करत भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Badminton Asia Junior Championships : कझाकिस्तानवर मात करत भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक

0
Badminton Asia Junior Championships : कझाकिस्तानवर मात करत भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक

‘बॅडमिंटन आशिया ज्युनिअर चॅम्पियनशिप’मध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी

यात्सुशिरो (जपान): जपानमध्ये सुरू असलेल्या ‘बॅडमिंटन आशिया ज्युनिअर मिक्स्ड टीम चॅम्पियनशिप’मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. शनिवारी झालेल्या ‘गट सी’मधील सलामीच्या सामन्यात भारताने कझाकिस्तानचा २-० (५५-३१, ५५-२१) असा धुव्वा उडवत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता गटातील अव्वल स्थान ठरवण्यासाठी भारताचा सामना चायनीज तैपेईशी होणार आहे.

https://prahaar.in/2026/06/27/air-quality-monitoring-air-quality-monitoring-stations-to-be-set-up-at-five-locations-in-mumbai/

सामन्याची सुरुवात महिला दुहेरीत दुर्गा ईशा कांड्रपू आणि कीर्ती मंचला यांनी ११-५ असा विजय मिळवून दिली. त्यानंतर मिश्र दुहेरीत पुनीत सुरेश आणि दीप्ती राज अदिती यांनी अटीतटीच्या लढतीत ११-१० अशा फरकाने विजय मिळवत भारताची आघाडी २२-१५ अशी वाढवली. त्यानंतरच्या तीन श्रेणींमध्ये भारतीय खेळाडूंनी पूर्ण वर्चस्व राखत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये भारतीय खेळाडूंनी कमालीचे नियंत्रण राखत कझाकिस्तानच्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यात ६ पेक्षा कमी गुणांवर रोखून सहज विजय मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here