मुंबई : आज म्हणजेच २४ जून बुधवारी भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत मुंबई आणि पालघरमधील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai Monsoon Red Alert)
यंदा मान्सूनने मुंबईत उशिरा प्रवेश केला आहे. साधारणपणे १० ते ११ जूनदरम्यान मान्सून मुंबईत दाखल होतो. मात्र, यावर्षी तो जवळपास दोन आठवडे उशिराने पोहोचला. विशेष म्हणजे २०२३ मध्येही मान्सून उशिराने दाखल झाला होता. मुंबईच्या हवामान इतिहासात १९५८ आणि १९७४ या वर्षांत सर्वाधिक उशिराने, म्हणजे २८ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. (Mumbai Monsoon Red Alert)
https://prahaar.in/2026/06/24/mumbai-monsoon-the-monsoon-finally-makes-a-strong-entry-in-mumbai-rain-arrives-after-a-13-day-wait-yellow-alert-issued-for-the-next-two-days/
शहरातील अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद :
मंगळवारी सकाळपासूनच मुंबईतील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, नायर रुग्णालय परिसर, एम. जोशी मार्ग, परळ टीटी, मालाड बस डेपो, महाराष्ट्रनगर आणि मानखुर्द येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीलाही फटका बसला. (Mumbai Monsoon Red Alert)
लोकल सेवा विस्कळीत; सखल भाग जलमय :
गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वे सेवेवरही झाला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे. दादर, माटुंगा आणि सायनसारख्या सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. दादर रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवर विरार-चर्चगेट मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असून हार्बर मार्गावरील सेवाही विलंबाने सुरू आहे. (Mumbai Monsoon Red Alert)
https://prahaar.in/2026/06/24/bmc-news-umbrellas-and-raincoats-made-by-disabled-people-appreciated-by-mumbai-mayor-and-commissioner/
दरम्यान, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा आणि रेल्वे विभाग सतर्क झाले आहेत. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai Monsoon Red Alert)