Home ब्रेकिंग न्यूज BMC News : एमआयएमचा एक नगरसेवक झाला कमी, जातप्रमाणपत्र वैधता समितीच्या निर्णयानंतर सभागृहात झाली घोषणा

BMC News : एमआयएमचा एक नगरसेवक झाला कमी, जातप्रमाणपत्र वैधता समितीच्या निर्णयानंतर सभागृहात झाली घोषणा

0
BMC News : एमआयएमचा एक नगरसेवक झाला कमी, जातप्रमाणपत्र वैधता समितीच्या निर्णयानंतर सभागृहात झाली घोषणा
MIM

मुंबई : मुंबई महापालिकेतील (BMC) प्रभाग १११मधील उबाठा नगरसेवक दिपक सावंत यांचे जातप्रमाण पत्र अवैध ठरल्याने त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर एम पूर्व विभागातील एमआयएमचे प्रभाग क्रमांक १३७चे नगरसेवक शमिर पटेल यांचेही महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने महापालिका सभागृहात त्यांचे महापालिका सदस्यत्व आपोआप रद्द होत असल्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले. त्यामुळे एमआयएमची महापालिकेतील नगरसेवक संख्या ०७ एवढी झाली आहे.

https://prahaar.in/2026/06/23/cm-devendra-fadnavis-the-chief-minister-held-a-meeting-with-bjp-mlas-at-varsha/

मुंबई महापालिकेच्या सलग दुसऱ्या सभागृहात महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एम पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १३७ मधून एमआयएमचे नगरसेवक शमीर रमजान हे विजय झाले होते. परंतु त्यांनी ज्या आरक्षण गटातून ते विजयी झाले आहे, त्या प्रभागातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी शमीर यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रारी केली होती. याबाबत अहिल्यानगर येथील जात वैधता पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध असल्याचे महापालिका सचिव विभागाला कळवल्यानंतर याबाबतची घोषणा महापालिका सभागृहात महापौर रितू तावडे यांनी शमीर यांचे महापालिका सदस्यत्व आपोआप रद्द होत असल्याची घोषणा केली.

एमआयआयचे मुंबईत आठ नगरसेवक असून यातील शमीर यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने त्यांची महापालिकेतील सदस्य संख्या ही ०७ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here