Monday, June 22, 2026

Sanjay Dina Patil : एका व्यक्तीच्या त्रासामुळे मी पक्ष सोडला ; खासदार संजय दिना पाटील यांचा आरोप

Sanjay Dina Patil  : एका व्यक्तीच्या त्रासामुळे मी पक्ष सोडला ; खासदार संजय दिना पाटील यांचा आरोप
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाले. उबाठाच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत असल्याचे जाहीर करत शिवसेनेत प्रवेश केला. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रम उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
खासदार संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी उबाठा सोडण्याचे कारण सांगितले. त्यांनी थेट नाव घेणे टाळले पण चतुराईने संजय राऊतांकडेच इशारा केला.संबंधित व्यक्तीबद्दल आपण पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रार केली. पण आपल्या बाजूने निर्णय घेण्यात आला नाही किंवा आपल्या अडचणीवर तोडगा काढण्यात आला नाही. म्हणून हा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले. मला ठाकरे कुटुंबीयांचा त्रास नव्हता "मला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर जी नेतेमंडळी आहेत, त्यांच्याबद्दल कोणताही प्रोब्लेम नाही. सगळ्यांनी मला मान-सन्मान दिलेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांना मान-सन्मान दिलेला आहे. मी पण तेवढ्याच गोष्टी करतो. कुणी मला एक रुपया करतो तर मी शंभर रुपये करतो. तेवढं केलेलं आहे", असं संजय दिना पाटील म्हणाले. मात्र एका व्यक्तीमुळे हे सर्व झालं असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
पक्षाचे मालक कोण आहेत ? संजय दिना पाटील म्हणाले "काल आपण सुप्रिया ताईंच्या मुलीच्या लग्नात बघितलं असेल, पक्षाचे मालक बदली झाले आहेत ना? सुप्रिया ताईंच्या मुलीच्या लग्नात येताना बघितलं ना तुम्ही, पक्षाचे मालक कोण आहेत ?","एक व्यक्ती आम्हा सर्वांना डिस्टर्ब करत आहे. आम्ही कुठल्या कार्यक्रमात जाऊ शकत नाहीत. आम्ही खासदार झाल्यावरही निधी वापरू शकत नाहीत. कोण शाखाप्रमुख माझ्याकडे येऊ शकत नाही. मला कार्यक्रमाला बोलवू शकत नाही. कारण काहीही सांगतात आणि नंतर इकडे येऊन सांगतात की कार्यक्रमाला येत नाही. उद्धव यांनी हे आधी करायला हवं होत उद्धव ठाकरे आता सर्व खासदारांच्या मतदारसंघात जात आहेत. पण हेच आधी आले असते, तर आता येण्याचीदेखील गरज पडली नसती. मला ज्या व्यक्तीकडून त्रास आहे त्याला सुनावलं असतं तर ही वेळच आली नसती ना? मी शिवसेनेत प्रवेश केला नसता तर इतरांचाही प्रवेश झाला नसता. मला बोलावून घेतलं असतं, आम्ही जे सांगत होतो, जिथे येऊन मला शिव्या दिल्या तिकडे येऊन माफी मागा. मी त्यांच्याबरोबर 'मातोश्री'वर गेलो असतो. विषय संपला असता. पण त्यांना ते करायचंच नाही. त्यांना ताकदवान लोकं नको. त्यांना गुलाम लोकं पाहिजेत", अशी टीका संजय दिना पाटील यांनी केली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा