Home क्रीडा FIFA World Cup FIFA World Cup 2026 Lionel Messi : पेनल्टी हुकली, पण विक्रम गाठला! मेस्सीच्या दोन गोलसह अर्जेंटिनाचा विजय

FIFA World Cup 2026 Lionel Messi : पेनल्टी हुकली, पण विक्रम गाठला! मेस्सीच्या दोन गोलसह अर्जेंटिनाचा विजय

0
FIFA World Cup 2026 Lionel Messi : पेनल्टी हुकली, पण विक्रम गाठला! मेस्सीच्या दोन गोलसह अर्जेंटिनाचा विजय
Lionel Messi

Lionel Messi : ‘फुटबॉलचा महानायक’ GOAT लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने पुन्हा एकदा आपल्या शानदार खेळाची झलक दाखवत अर्जेंटिनाला FIFA World Cup 2026 च्या बाद फेरीत पोहोचवले. ऑस्ट्रियाविरुद्धच्या गट ‘J’ सामन्यात अर्जेंटिनाने २-० असा विजय मिळवला.

सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला मेस्सीने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुखापत वेळेत (Stoppage Time) दुसरा गोल झळकावत त्याने अर्जेंटिनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, सामन्यात मेस्सीला मिळालेली पेनल्टी (Penalty) तो गोलमध्ये (Goal) रूपांतरित करू शकला नाही. मात्र त्याचा संघाच्या विजयावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.

https://prahaar.in/2026/06/22/icc-takes-a-major-decision-for-women-cricketers/

या दोन गोलांच्या जोरावर लिओनेल मेस्सीने FIFA World Cup इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनण्याचा मान मिळवला. त्याने जर्मनीचा माजी स्टार स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोझे याचा विक्रम मोडीत काढत इतिहास रचला. मेस्सीच्या दमदार कामगिरीमुळे अर्जेंटिनाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले असून, विश्वचषक जिंकण्याच्या त्यांच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here