Home साप्ताहिक अर्थविश्व CNG Price Hike : पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका! सीएनजी १ रुपयाने महाग; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

CNG Price Hike : पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका! सीएनजी १ रुपयाने महाग; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

0
CNG Price Hike : पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका! सीएनजी १ रुपयाने महाग; मध्यरात्रीपासून नवे दर लागू
CNG

पुणे : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. शहरात सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून नव्या दरवाढीनंतर वाहनधारकांच्या खर्चात भर पडणार आहे. (CNG Price Hike)

सोमवारी (१५ जून) मध्यरात्रीपासून पुण्यात सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ९४.७५ रुपये प्रति किलो दराने मिळणारा सीएनजी आता ९५.७५ रुपये प्रति किलो दराने विकला जाणार आहे. या वाढीमुळे रिक्षाचालक, कॅब चालक तसेच सीएनजी वाहनधारकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. (CNG Price Hike)

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सीएनजीच्या दरात २.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अल्पावधीतच पुन्हा १ रुपयांची वाढ झाल्याने वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सततच्या दरवाढीमुळे दैनंदिन प्रवासाचा खर्च वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. (CNG Price Hike)

https://prahaar.in/2026/06/16/former-bjp-mla-patlya-guruji-passes-away-melghats-veteran-leader-bid-a-final-farewell-widespread-mourning/

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ आणि मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती यामुळे इंधनाच्या दरांवर दबाव निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ऊर्जा क्षेत्रावर परिणाम झाला असून त्याचे पडसाद देशांतर्गत इंधन दरांवरही उमटत आहेत. (CNG Price Hike)

दरम्यान, अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाला पूर्णविराम मिळाल्याची घोषणा झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराची घोषणा केल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. (CNG Price Hike)

https://prahaar.in/2026/06/16/deputy-chief-minister-eknath-shinde-reviewed-pre-monsoon-preparations-in-mumbai/

मात्र, पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याच्या शक्यता व्यक्त होत असतानाच सीएनजीच्या दरवाढीने पुणेकरांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. आता आगामी काळात इंधनाच्या दरांमध्ये नेमके काय बदल होतात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. (CNG Price Hike)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here