Home मनोरंजन Batwara 1947: सनी देओलच्या आगामी चित्रपटाचे नाव बदलले; ‘लाहोर 1947’ आता ‘बंटवारा’ म्हणून प्रेक्षकांसमोर

Batwara 1947: सनी देओलच्या आगामी चित्रपटाचे नाव बदलले; ‘लाहोर 1947’ आता ‘बंटवारा’ म्हणून प्रेक्षकांसमोर

0
Batwara 1947: सनी देओलच्या आगामी चित्रपटाचे नाव बदलले; ‘लाहोर 1947’ आता ‘बंटवारा’ म्हणून प्रेक्षकांसमोर

Bollywood  News: सनी देओलच्या (Sunny Deol) बहुचर्चित पीरियड ड्रामा चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत ‘लाहोर १९४७’ (Lahore १९४७ ) या नावाने ओळखला जाणारा हा चित्रपट आता नव्या नावाने प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलून ‘बंटवारा’ (Batwara १९४७)असे ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत रंगली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत असून निर्मितीची धुरा आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसने सांभाळली आहे. फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या कथेसाठी ‘बंटवारा’ हे नाव अधिक योग्य असल्याचे निर्मात्यांना वाटल्याने हा बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

https://prahaar.in/2026/06/07/patrapatri-plays-100/

मिळालेल्या माहितीनुसार, ‘बंटवारा’ या नावाचे हक्क आधी एका जुन्या हिंदी चित्रपटाशी संबंधित होते. त्यामुळे हे नाव वापरण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली. यासाठी आमिर खान यांनी संबंधित कुटुंबीयांशी थेट चर्चा केल्याचेही वृत्त आहे. चर्चेनंतर चित्रपटाच्या नावाचे हक्क अधिकृतरीत्या मिळाल्याचे सांगितले जात आहे.

१९८९ मध्ये ‘बंटवारा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात अनेक नामांकित कलाकार झळकले होते. त्यामुळे हे नाव पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार असल्याने चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.

https://prahaar.in/2026/06/08/goregaon-mulund-link-road-gmlr/

दरम्यान, नव्या ‘बंटवारा’ चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत प्रीती झिंटा, अली फजल, करण देओल आणि शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे आमिर खान देखील या चित्रपटात एका खास भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मोठ्या बजेटमध्ये तयार होत असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. चित्रपटाचे नाव बदलल्यानंतर त्याबाबतची चर्चा आणखी वाढली असून आता चाहत्यांचे लक्ष त्याच्या प्रदर्शनाकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here