Home क्राईम Nashik TCS Case : नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणात नवा दावा; निदा खानने केला ‘त्या’ घटनेचा खुलासा

Nashik TCS Case : नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणात नवा दावा; निदा खानने केला ‘त्या’ घटनेचा खुलासा

0
Nashik TCS Case : नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणात नवा दावा; निदा खानने केला ‘त्या’ घटनेचा खुलासा

नाशिक : नाशिकमधील एका आयटी कंपनीशी संबंधित कथित लैंगिक छळ (sexual harassment) आणि धर्मांतर प्रकरणाचा (Religious conversion) तपास सुरू असताना या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या निदा खान (Nida Khan) हिची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत असून, चौकशीदरम्यान काही महत्त्वाचे दावे समोर आल्याची माहिती मिळत आहे. (Nashik Crime )

चौकशीत धक्कादायक माहिती समोर

तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान निदा खानने संबंधित पीडित तरुणीला आपल्या घरी नेल्याचे मान्य केल्याचे सांगितले जात आहे. तसेच तिला नमाज पठणाबाबत मार्गदर्शन केल्याचाही दावा तिने केल्याची चर्चा आहे. मात्र, या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

https://prahaar.in/2026/06/07/ek-nath-shinde-kurla-will-not-let-there-be-any-shortage-of-funds-for-development/

या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा विविध अंगांनी तपास केला जात असून, संबंधित व्यक्तींची भूमिका, त्यांच्यातील संपर्क आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. तपास यंत्रणा या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी होते का, याचाही शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ९ जूनपासून या प्रकरणाच्या नियमित सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

https://prahaar.in/2026/06/08/mahadbt-students-scheme-students-pursuing-higher-education-in-big-cities-will-get-rs-30000/

दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत असून, अंतिम निर्णय न्यायालयाकडून दिला जाणार आहे. त्यामुळे तपास आणि सुनावणीदरम्यान समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here