Home ब्रेकिंग न्यूज Municipal Schools : महापालिका शाळांमधील मुलांसाठी वह्या, स्टेशनरी आणि गणवेश खरेदीला मान्यता

Municipal Schools : महापालिका शाळांमधील मुलांसाठी वह्या, स्टेशनरी आणि गणवेश खरेदीला मान्यता

0
Municipal Schools : महापालिका शाळांमधील मुलांसाठी वह्या, स्टेशनरी आणि गणवेश खरेदीला मान्यता
Muncipal Schools

शालेय साहित्य खरेदीला विलंब, मुलांना मिळणार उशिराने

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ शालेय वस्तुंची खरेदी जेम पोर्टलवरुन करण्याचा निर्णय घेतल्यांनतर आता एक एक प्रस्ताव मंजुरीला येत आहे. त्यानुसार वह्या, गणवेश संच आणि स्टेशनरी यांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, यंदा महापालिका शाळा येत्या १२ जूनपासून सुरुवात होणार असली तरी प्रत्यक्षात या वस्तूंचे वाटप उशिराने होणार आहे. परंतु या जून अखेरपर्यंत मुलांच्या हाती वह्यांचा संच पडला जाईल असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना शालेय वस्तूंची खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर छत्री आणि रेनकोट नंतर शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत वह्या, गणवेश (Uniform) संच आणि स्टेशनरी (Stationery) संच यांची खरेदीला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव आले असताना वह्याच्या खरेदीच्या प्रस्तावावर बोलतांना जेम पोर्टल (GeM Portal) हे महापोर्टलप्रमाणेच काम करत असल्याचे सांगितले. त्यामुळे १२ जून पर्यंत शालेय वस्तू मुलांना मिळणार नसल्याचे सांगितले. यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी जेम पोर्टलवर चर्चा होते हे आवश्यक आहे. जेम पोर्टलवर शंका असणाऱ्यांना याची कल्पना व्हावी यासाठी याचे सादरीकरण स्थायी समितीमध्ये केले जावे अशी मागणी केली. मात्र, जेम पोर्टलद्वारे निविदा मागवल्यामुळे कमी किंमतीत या वस्तू प्राप्त होवून महापालिकेचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

https://prahaar.in/2026/06/06/mumbai-waste-management-the-area-from-byculla-to-shiv-will-be-turned-into-garbage/

डॉ सईदा खान यांनी मुलांना वाढत्या वयाचे गणवेश दिले जावेत अशी सूचना दिल्या जाव्यात. तर शितल गंभीर यांनी मागणी ४ ते ५ वर्षांमधील मुलांना देण्यात येणाऱ्या शालेय वस्तूंची माहिती देण्यात यावी. यामध्ये किती किंमत होती आणि कितीमध्ये खरेदी केली तसेच कधी वितरीत केले याची माहिती मिळावी. तर श्रध्दा जाधव यांनी जेम पोर्टलवरून करा किंवा कुठूनही खरेदी करा, पण मुलांना या वस्तू वेळेत मिळायला हव्यात असे सांगत सर्व साहित्य स्थायी समितीमध्ये सादर करून सर्व सदस्यांना दाखवण्यात यावे अशी मागणी केली.

https://prahaar.in/2026/06/06/mumbai-news-major-update-on-the-vakola-bkc-bridge-98-of-the-work-is-complete-mumbaikars-commute-will-take-just-10-minutes/

यावेळी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी जेम पोर्टलवर (GeM Portal) संपूर्ण भारतीतील कंपन्या सहभागी होत असून यामध्ये बेसिक क्वॉलिटी प्रथमच चेक केली जाते. त्यानंतरही काही जणांकडून अनामत रक्कम वेळेत न भरणे किंवा अन्य कारणांमध्ये बऱ्याच कंपन्या बाद होतात. या वस्तू शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी मिळणार नाही ही वस्तूस्थिती असली तरी जूनमध्ये वह्या आणि स्टेशनरी मुलांना मिळतील यासाठी प्रयत्न केला जाईल,असे आश्वासन त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here