स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली मागणी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) एमआरआय (MRI) मशिन्स स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये एमआरआय मशिन्ससह सीटी स्कॅन (CT Scan) मशिन्स रुग्णांच्या संख्येनुसार उपलब्ध करून देण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये केईएम रुग्णालयामध्ये नवीन एमआरआय मशिन्स उपलब्ध होणार असून सध्या वापरातील मशिन्सचाही वापर सुरुच राहिल असे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, स्थायी समितीच्यावतीने आरोग्य व्यवस्था आणि उपकरणांची सुविधा याबाबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल असे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी जाहीर केले.
मुंबई महापाालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये केईएम रुग्णालयामधील एमआरआय (MRI) मशिन्स तसेच एन्जिओग्रॉफीबाबतचा (Angiography) वार्षिक देखभालीचा प्रस्ताव आला असता उबाठाचे यशोधर फणसे यांनी सिमेन्स कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या एमआरआय मशिन्स वादात अडकल्या होत्या. या खरेदी केल्यानंतर तीन वर्षे हमी कालावधी व पुढील पाच वर्षे त्यांच्या देखभालीचे कंत्राट देण्यात येत आहे. त्यामुळे या मशिन्सचा पुढे किती दिवस वापरात असेल याची माहिती देण्याची मागणी केली. तर केईएम रुग्णालयात एमआरआयची एकमेव मशिन्स असल्याचे सांगत काँग्रेसच्या डॉ अजंता यादव यांनी पाच ते सहा हजार ओपीडी असलेल्या रुग्णालयांमध्ये एकमेव मशिन्स आहे आणि प्रत्येक रुग्णाला ३ ते ४ महिने पुढील तारीख दिले जाते असे सांगितले. परंतु खासगीमध्ये एका दिवसांमध्ये हे रिपोर्ट काढून मिळतात.
बच्चे कंपनींसाठी आकर्षक डबल डेकर बसचीही सुविधा मुंबई : जिजामाता उद्यानात फिरणे आता अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक होणार आहे. ज्येष्ठ नागरिक, ...
तर डॉ. सईदा खान यांनी महापालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांसह १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये एमआरआयची सुविधा प्राप्त व्हायला हवी अशी मागणी केली. तर अश्रफ आझमी यांनी ही सुविध उपलब्ध करून देता प्रशासन एकप्रकारे पीपीपीवर आधारीत खासगी संस्थांच्या माध्यमातून सेवा पुरवण्यावर भर देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तर यामिनी जाधव यांनी एमआरआयची सुविधा द्यावीच पण त्या आधी सीटी स्कॅनची सुविधा वाढवली जावी अशी मागणी केली. एमआरआय करण्यापूर्वी सीटी स्कॅन चाचणी केली जाते, त्यामुळे सीटी स्कॅन मशिन्सची संख्या वाढवली तरी एमआरआय चाचणींची संख्या कमी होईल असे त्यांनी सांगितले. महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत श्रध्दा जाधव यांनी एमआरआयी आणि सी टी स्कॅनची सुविधाही मिळत नाही ही परिस्थिती असल्याचे सांगितले. तर केवळ या चाचण्याच नाही त शेडुल्डवरील औषधेही वेळेत मिळत नाही असाही आरोप केला. त्यामुळे केईएममध्ये अतिरिक्त एमआरआय मशिन्स द्या अशी मागणी केली. तर आरोग्याबाबत स्थायी समितीच्यावतीने एक विशेष बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली.
यावर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी केईएममध्ये सन २०१६मध्ये एमआरआयची मशिन्स खरेदी केली हेाती आणि प्रथम ३ वर्षे हमी कालावधी व पुढील पाच वर्षे वार्षिक देखभालीचे कंत्राट दिले होते. आता हे ९ वे वर्ष आहे. मशिन सध्या कार्यरत असून नवीन मशिन्स येणार आहे. पण ही मशिन्स आल्यानंतरही जुनी मशिन्स भंगारात जाणार नाही. सध्या ही मशिन्स कार्यान्वित असल्याने त्या मशिन्सचाही वापर केला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.





