मुंबई : राज्यातील विविध भागांत १ जूनपासून वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी हा पाऊस मान्सूनचा नाही असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पावसावर विसंबून पेरणीची घाई करू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
सध्या नैऋत्य मान्सून अद्याप केरळ किनारपट्टीपर्यंत पोहोचलेला नसून, महाराष्ट्रात त्याच्या आगमनासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. उपलब्ध हवामान अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागांत किमान १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे.
राज्यातील अनेक भागांत वादळी पावसाचा अंदाज :
https://prahaar.in/2026/05/31/a-manager-in-the-it-sector-for-9-years-now-drives-a-rickshaw-took-a-bold-decision-to-quit-a-well-paid-job/
पेरणीपूर्वी स्थिर पावसाची प्रतीक्षा करा :
कृषी तज्ज्ञांच्या मते, मान्सूनपूर्व वादळी पाऊस हा बहुतांश वेळा तात्पुरता आणि अनियमित स्वरूपाचा असतो. अशा पावसावर आधारित पेरणी केल्यास नंतर दीर्घ खंड पडल्यास बियाण्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता, मान्सूनची नियमित आणि स्थिर सुरुवात झाल्यानंतरच शेतीकामांचे नियोजन करावे.
विजांच्या कडकडाटादरम्यान घ्या विशेष काळजी :
वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह शेतकऱ्यांनीही आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे. शेतात काम करताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच पाळीव जनावरे उघड्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी बांधावीत. वीज पडण्याच्या घटनांपासून बचावासाठी हवामान विभागाच्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/05/31/chirag-tyagi-he-returned-after-winning-the-gold-medal-but-never-reached-home-25-year-old-indian-para-runner-chirag-tyagi-shot-dead/
हवामानातील बदलांवर लक्ष ठेवण्याची गरज :
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
- ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये
- शेतात पुरेशी ओल आहे का, याची खात्री करावी
- वादळी वाऱ्यामुळे शेतातील साहित्य सुरक्षित ठेवावे
- विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात थांबणे टाळावे
- विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे