नाशिक : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या नाशिक युनिटमधील कथित लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता १२ जून रोजी होणार आहे. नाशिक रोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने शनिवारी सुनावणी पुढे ढकलत पुढील तारीख निश्चित केली.
याच प्रकरणातील अन्य आरोपी दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जांवरही १२ जूनलाच सुनावणी होणार आहे. निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. ११ मे रोजी तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यानंतर तिच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) नाशिक न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या आठ वेगवेगळ्या गुन्ह्यांशी संबंधित हे आरोपपत्र भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत दाखल करण्यात आले आहे.
मुंबई (Mira Road Forced Conversion Case) : मुंबईलगतच्या मिरा रोड (Mira Road) परिसरातील काशीमीरा येथे एका हिंदू तरुणीची मुस्लिम युवकाकडून लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची ...
या आरोपपत्रात रझा रफीक मेमन, शाहरुख हुसेन कुरेशी, अश्विनी अशोक चैनानी, तौसिफ अत्तार, शफी भिकन शेख, दानिश शेख आणि निदा खान यांच्यासह इतर आरोपींची नावे समाविष्ट आहेत.
याआधी २२ मे रोजी SIT ने देवलाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात तब्बल १,५०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबरोबरच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
TCS नाशिक युनिटमधील अनेक महिला कर्मचाऱ्यांनी शोषण, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग, मानसिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने SIT स्थापन केली होती.
नवी दिल्ली (South Delhi Building Collapse) : दक्षिण दिल्लीतील साकेत मेट्रो स्थानकाजवळ शनिवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. सैदुलाजाब परिसरातील पाच मजली व्यावसायिक ...
तक्रारदार महिलांच्या म्हणण्यानुसार, काही कर्मचाऱ्यांवर व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून विशिष्ट धार्मिक प्रथा पाळण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच प्रार्थना करणे, मांसाहार स्वीकारणे आणि धार्मिक रूढींनुसार वागण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निदा खानवर महिला कर्मचाऱ्यांना इस्लामिक परंपरेनुसार पोशाख आणि वर्तन करण्याचा सल्ला देत दबाव निर्माण केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून तपास सुरू आहे.
दरम्यान, TCS ने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कोणत्याही प्रकारच्या छळ, दबाव किंवा सक्तीविरोधात कंपनीची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आरोपांमध्ये नाव आलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचेही कंपनीने म्हटले आहे.




