नवी दिल्ली : आयपीएल २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून (Lucknow Super Giants) पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरचे (Arjun Tendulkar) त्याचे वडील आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी खास पद्धतीने अभिनंदन केले. पंजाब किंग्सविरुद्ध अर्जुनने आपल्या संघाला विजय मिळवून दिला नसला तरी, त्याच्या कामगिरीने नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामन्यानंतर, सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून आपला मुलगा अर्जुनचे कौतुक केले. त्यांची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे.
https://prahaar.in/2026/05/24/ipl-2026-mi-vs-rr-do-or-die-for-rajasthan-punjabs-playoff-dreams-depend-on-todays-match/
https://prahaar.in/2026/05/24/pbks-vs-lsg-ipl-2026/
आयपीएल २०२६ अर्जुन तेंडुलकरच्या कारकिर्दीसाठी विशेष मानली जात आहे, कारण तो मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त दुसऱ्या फ्रँचायझीसाठी खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून लखनऊततचच सुपर जायंट्स संघात हस्तांतरित करण्यात आले. नव्या वातावरणातील आपल्या पहिल्याच संधीत त्याने आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. (Arjun Tendulkar)
Well done, Arjun. ❤️
Proud of the way you’ve carried yourself through this season, always believing in your ability, staying patient, working hard quietly, and remaining positive despite having to wait for your opportunity till the very last match.
Cricket tests patience as much… pic.twitter.com/3RdiGkXbfT— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 23, 2026