Home क्रीडा Gurindervir Singh : गुरिंदरवीरची ऐतिहासिक कामगिरी, नोंदवला नवा विक्रम

Gurindervir Singh : गुरिंदरवीरची ऐतिहासिक कामगिरी, नोंदवला नवा विक्रम

0
Gurindervir Singh : गुरिंदरवीरची ऐतिहासिक कामगिरी, नोंदवला नवा विक्रम

रांची : झारखंडची राजधानी असलेल्या रांचीत फेडरेशन कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत शंभर मीटर स्प्रिंट या प्रकारात गुरिंदरवीर सिंह या धावपटूने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने १०० मीटरचे अंतर १०.०९ सेकंदात पार केले. उसैन बोल्टने १०० मीटरचे अंतर ९.५८ सेकंदात पूर्ण करून विश्वविक्रम केला होता. गुरिंदरवीर बोल्टचा विक्रम ५१ सेकंदांच्या फरकामुळे मोडू शकला नाही. पण गुरिंदरवीरने नोंदवलेली वेळ हा एक नवा राष्ट्रीय विक्रम आहे.

https://prahaar.in/2026/05/24/ipl-2026-mi-vs-rr-do-or-die-for-rajasthan-punjabs-playoff-dreams-depend-on-todays-match/

गुरिंदरवीर सिंहने शंभर मीटर स्प्रिंट या प्रकारात १०.०९ सेकंदांची वेळ नोंदवली. याआधी त्याने पहिल्या उपांत्य फेरीत अर्थात पहिल्या सेमी फायनलमध्ये १०.१७ सेकंदांची वेळ नोंदवली होती. गुरिंदरवीरच्याआधी शंभर मीटर स्प्रिंट या प्रकारात अनिमेश कुजुरने १०.१८ सेकंदांची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला होता. हा विक्रम आता मोडीत निघाला आहे.

यंदा २३ जुलैपासून स्कॉटलंडमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होणार आहे. तसेच १९ सप्टेंबरपासून जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा अर्थात एशियन गेम्स आहेत. या दोन स्पर्धांच्या निमित्ताने गुरिंदरवीर सिंहला विश्वविक्रम करण्याची संधी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here