मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक ने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला तब्बल २.८७ लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश देण्याची घोषणा केली आहे. जागतिक आर्थिक आव्हाने, वाढती अनिश्चितता आणि विविध आर्थिक दबावांच्या पार्श्वभूमीवर हा निधी केंद्र सरकारसाठी मोठा आर्थिक दिलासा मानला जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या इतिहासातील केंद्र सरकारला दिला जाणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लाभांश ठरणार आहे. (Reserve Bank Of India)
https://prahaar.in/2026/05/22/sbi-close-for-a-week-big-news-for-sbi-customers-banking-services-likely-to-be-suspended-from-tomorrow-important-work-to-be-done-today/
मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला २.६९ लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. यंदाचा लाभांश त्या तुलनेत अधिक असून नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. (Reserve Bank Of India)
https://prahaar.in/2026/05/20/gold-rate-today-gold-price-sees-another-big-jump-increase-of-rs-1310-per-tola-in-a-single-day/
यापूर्वी २०२३-२४ मध्ये रिझर्व्ह बँकेने २.१ लाख कोटी रुपये, तर २०२२-२३ मध्ये ८७ हजार ४१६ कोटी रुपये केंद्र सरकारकडे हस्तांतरित केले होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत लाभांशाच्या रकमेत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. (Reserve Bank Of India)
रिझर्व्ह बँकेच्या या विक्रमी लाभांशामुळे केंद्र सरकारच्या महसुलात मोठी भर पडणार असून पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण योजना आणि विकास प्रकल्पांसाठी अतिरिक्त आर्थिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Reserve Bank Of India)