Home साप्ताहिक अर्थविश्व Gold Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी; एकाच दिवसात प्रति तोळा १३१० रुपयांची वाढ

Gold Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी; एकाच दिवसात प्रति तोळा १३१० रुपयांची वाढ

0
Gold Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी; एकाच दिवसात प्रति तोळा १३१० रुपयांची वाढ
gold

मुंबई : जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि वाढत्या राजकीय तणावाचा थेट परिणाम पुन्हा एकदा भारतीय ग्राहकांवर दिसून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असून, मागील आठवड्यात दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अल्पकाळच टिकला. (Gold Rate Today)

https://prahaar.in/2026/05/20/melody-trend-and-parle-shares-melody-trend-reaches-its-peak-parle-shares-rose-in-an-instant-know-what-exactly-happened/

सोन्याच्या दरात आज पुन्हा मोठी वाढ नोंदवली गेली असून, प्रति तोळा (१० ग्रॅम) तब्बल १,३१० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसली आहे.तज्ज्ञांच्या मते, इराण आणि अमेरिकेमधील वाढता युद्धजन्य तणाव हा या दरवाढीमागील प्रमुख कारण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून, कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे. परिणामी महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अशा अनिश्चित परिस्थितीत गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या जोखमीच्या पर्यायांऐवजी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत. सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे दर पुन्हा भडकले आहेत. (Gold Rate Today)

https://prahaar.in/category/weekly/financial-world/#google_vignette

आजचे सोन्याचे दर :

२४ कॅरेट सोने –

प्रति तोळा : १,३१० रुपयांची वाढ; नवीन दर १,५८,३५० रुपये

८ ग्रॅम : १,०४८ रुपयांची वाढ; नवीन दर १,२६,६८० रुपये

१० तोळे : १३,१०० रुपयांची वाढ; नवीन दर १५,८३,५०० रुपये (Gold Rate Today)

२२ कॅरेट सोने –

प्रति तोळा: १,२०० रुपयांची वाढ; नवीन दर १,४५,१५० रुपये

८ ग्रॅम: ९६० रुपयांची वाढ; नवीन दर १,१६,१२० रुपये

१० तोळे: १२ हजार रुपयांची वाढ; नवीन दर १४,५१,५०० रुपये (Gold Rate Today)

१८ कॅरेट सोने –

प्रति तोळा: ९८० रुपयांची वाढ; नवीन दर १,१८,७६० रुपये

८ ग्रॅम: ७८४ रुपयांची वाढ; नवीन दर ९५,००८ रुपये

१० तोळे: ९,८०० रुपयांची वाढ; नवीन दर ११,८७,६०० रुपये (Gold Rate Today)

https://prahaar.in/2026/05/20/yashwant-cooperative-bank-closed-how-will-account-holders-get-money-know-the-complete-process/

सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारातील तणाव आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता, येत्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Gold Rate Today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here