नागपूर : नागपूर शहरात गुरुवारी (७ मे) दुपारनंतर अचानक झालेल्या मुसळधार पावसाने आणि वेगवान वादळी वाऱ्यांनी जनजीवन विस्कळीत झाले. या खराब हवामानाचा मोठा फटका विमानसेवेलाही बसला. विशेषतः IndiGo च्या बेंगळुरू–नागपूर विमानाला नागपूर विमानतळावर उतरणे शक्य न झाल्याने ते रायपूरकडे वळवण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
https://prahaar.in/2026/05/08/team-india-new-coach-gautam-gambhir-preparing-to-take-a-big-decision-finally/
तथापि, धावपट्टीवरील दृश्यमानता कमी होणे, वाऱ्यांचा वेग आणि सुरक्षेच्या निकषांचा विचार करून अखेर विमान रायपूर विमानतळाकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान सुरक्षितपणे रायपूर येथे उतरल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रवाशांना नंतर पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.
https://prahaar.in/2026/05/08/nida-khan-is-sheltered-by-imtiaz-jalil-minister-sanjay-shirsat-attacks-imtiaz-jalil/
विमानतळ प्रशासनाने सांगितले की, खराब हवामानामुळे सुरक्षेला प्राधान्य देत काही उड्डाणांचे वेळापत्रक बदलावे लागले. अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे अनेक प्रवाशांना विमानतळावरच थांबावे लागले. काही प्रवाशांनी विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली, तर काहींनी सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगितले.