Nashik TCS Case : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर, लैंगिक शोषण आणि मानसिक छळ प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान (Nida Khan) अखेर पोलिसांच्या ताब्यात आली आहे. नाशिक (Nashik) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पोलिसांनी राबवलेल्या एका अत्यंत गुप्त आणि वेगवान मोहिमेत निदा खानला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या.
दरम्यान, धर्मांतर आणि लौंगिक शोषण प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या निदा खानबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. निदा खान ही दोन महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची UPT (युरिन प्रेग्नंसी टेस्ट) करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या टेस्टमध्ये निदा खान दोन महिन्यांची गरोदर असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून निदा खानबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे.
नाशिक: नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विविध विकासकामे सुरु आहे. मात्र या विकासकामांमध्ये नाशिक रिंगरोड प्रकल्प ...
टीसीएस (TCS) प्रकरण उघड झाल्यानंतर निदा खानने नाशिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला होता. गर्भवती असल्याचं कारण देत तिने पुन्हा एकदा जमिनासाठी प्रयत्न केला होता, मात्र तिला अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर तिला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणातील चार आरोपी रजा रफीक मेमन, तौसीफ बिलाल अत्तार, दानिश शेख आणि शाहरुख हुसैन शौकत कुरेशी यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. हे सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. परंतु या प्रकरणाची मास्टरमाईंड असलेली निदा खान मात्र फरार झाली होती. ती अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर तिला आता छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक गु्न्हे शाखेच्या पोलिसांकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. थोड्याच वेळात पोलीस तिला न्यायालयात हजर करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, सक्तीचे धर्मांतर आणि विनयभंग प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात सध्या ...





