इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आज म्हणजेच मंगळवार २८ एप्रिल रोजी पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. गेल्या ४८ तासांतील इस्लामाबादचा हा त्यांचा तिसरा दौरा आहे. रशियाचा दौरा पूर्ण केल्यानंतर त्यांनी ही भेट दिली आहे. अमेरिकेसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी सुरू असलेल्या व्यापक राजनैतिक प्रयत्नांचा हा भाग असल्याचे मानले जात आहे.
अराघची यांच्या वारंवार पाकिस्तान दौऱ्यांमुळे सध्याच्या परिस्थितीत इस्लामाबाद शांतिदूताची भूमिका बजावत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः, इराण आणि अमेरिका यांच्यातील अप्रत्यक्ष संवाद सुलभ करण्यामध्ये पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे या भेटीतून स्पष्ट होते.
https://prahaar.in/2026/04/28/indonesia-train-accident-terrible-train-accident-in-indonesia-death-toll-rises-to-14-rescue-operations-underway/
अराघची यांनी तेहरान आणि मॉस्को यांच्यातील सहकार्यावरही चर्चा केली. संबंध अधिक बळकट करण्याच्या प्रस्तावांचाही यात समावेश होता. त्यांनी इराण-रशिया संबंधांना रणनीतिक भागीदारी असे संबोधले आणि संघर्षकाळात मॉस्कोकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले, “अलीकडील युद्धात हे स्पष्ट झाले की, इराणकडे रशियासारखा महान मित्र आणि सहकारी आहे. तुमच्या भूमिकेसाठी आणि पाठिंब्यासाठी आम्ही आभारी आहोत.”
https://prahaar.in/2026/04/28/israel-lebanon-war-resumes-hezbollah-drone-attack-on-israeli-soldiers/
या प्रस्तावात अणुचर्चा पुढील टप्प्यात घेण्यासह, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे आणि युद्ध समाप्त करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रदेशात तणावपूर्ण वातावरण असताना ही राजनैतिक हालचाल सुरू आहे. त्यामुळे हे प्रयत्न शांतता प्रस्थापित करण्यात कितपत यशस्वी ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.