Home ब्रेकिंग न्यूज Rohit Shetty : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारा मुख्य आरोपी आगऱ्यातून अटकेत

Rohit Shetty : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारा मुख्य आरोपी आगऱ्यातून अटकेत

0
Rohit Shetty : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारा मुख्य आरोपी आगऱ्यातून अटकेत
Rohit Shetty

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या जुहू येथील घरावर गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शुभम लोणकर टोळीशी संबंधित सराईत गुंड प्रदीप कुमार उर्फ गाठ याला उत्तर प्रदेशमधील आग्रा-इटावा रोडवरून अटक करण्यात आली.

१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री उशिरा, कुख्यात गुन्हेगार शुभम लोणकरच्या आदेशावरून ‘शेट्टी टॉवर’वर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोक्का, भारतीय न्याय संहिता आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

संयुक्त कारवाईत यश :

मुंबई गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी आग्रा परिसरात लपल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार उत्तर प्रदेश एसटीएफच्या मदतीने सापळा रचून गुरुवारी (१६ एप्रिल) दुपारी छदामी मठ परिसरातून त्याला अटक करण्यात आली.

सोशल मीडियातून गुन्हेगारीकडे वळण :

पोलिस चौकशीत आरोपीने धक्कादायक माहिती दिली आहे. शुभम लोणकर टोळीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पोस्ट्स पाहून तो प्रभावित झाला होता. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्याने आपल्या साथीदारांसह हा गोळीबार केल्याची कबुली दिली.

आतापर्यंत १० जण अटकेत :

या प्रकरणात यापूर्वीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण १० जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. प्रदीप कुमार हा अटक टाळण्यासाठी सतत ठिकाण बदलत होता. आता मात्र त्याला मुंबई गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.