Home क्रीडा ‘हिटमॅन’चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

‘हिटमॅन’चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

0
‘हिटमॅन’चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या
'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या (Photo: ANI)

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा कर्णधार दुसरा तिसरा कोणी नसून रोहित शर्मा आहे. मागच्या काही वर्षात त्याने मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा यशस्वीरित्या पार पाडली आहे. त्यामुळे फ्रेंचायझीने त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. पण फ्रेंचायझीने त्याच्या नावाची घोषणा करताना तारीख आणि वेळेचं गणित जुळवून आणलं. त्यामुळे त्या मुहूर्ताची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी म्हणजेच 17:45ला सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात फक्त एक ओळ लिहिली की, ‘Smile, Everbody Smile’.. रोहित शर्मा म्हणाला की, आयपीएलच्या 20व्या पर्वासाठी आणि पुढील आव्हानांसाठी तयार आहे. आपल्या संघाला आनंद साजरा करण्याच्या अनेक संधी देण्याचं ध्येय आहे.

का निवडली 17 वाजून 45 मिनिटांची वेळ?

मुंबई इंडियन्सने पोस्ट करण्यासाठी जी वेळ निवडली ती खूपच महत्त्वाची आहे. कारण याचा संदर्भ थेट रोहित शर्माच्या जर्सीशी जुळवला जात आहे. रोहित शर्माच्या जर्सीचा नंबर 45 आहे. त्याच्या कर्णधारपदाची घोषणा 17:45 वाजता केली आणि चाहत्यांना एक खास संदेश दिला. 17:45 मधील 17 हा अंक रोहित शर्मा 17 वर्षांपासून फ्रेंचायझीसोबत असल्याचं दाखवत आहे. तो आयपीएल 2027 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी 17वं पर्व खेळणार आहे. रोहित शर्माने 2013 पहिल्यांदा मुंबई इंडियन्सची सूत्र हाती घेतली होती. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल जेतेपद मिळवलं होतं. फ्रेचायझीसाठी सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याची गणना होते.

https://www.prahaar.in/2026/11/27/rohit-sharma-first-reaction-upon-becoming-mumbai-indians-captain/

आयपीएल 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने शेवटचं जेतेपद जिंकलं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्सची स्थिती खालावली. 2021 मध्ये मुंबई इंडियन्स संघ पाचव्या स्थानी, 2022 मध्ये दहाव्या स्थानी आणि 2023 मध्ये क्वॉलिफायर 2 मध्ये स्थान मिळवून बाहेर गेला. त्यानंतर हार्दिक पांड्याकडे सूत्र सोपवण्यात आली. आयपीएल 2024 मध्ये मुंबईचा संघ दहाव्या, 2025 मध्ये क्वॉलिफायर 2 आणि 2026 मध्ये नवव्या स्थानावर राहिला. मुंबई इंडियन्स आता रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली 20व्या हंगामात खेळणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्याची फ्रँचायझीला आशा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here