Home महत्वाची बातमी Honda ALPHA चा नवा टीझर रिलीज ! 2 डिसेंबरला होणार ग्लोबल डेब्यू ; भारतातच होणार निर्मिती

Honda ALPHA चा नवा टीझर रिलीज ! 2 डिसेंबरला होणार ग्लोबल डेब्यू ; भारतातच होणार निर्मिती

0
Honda ALPHA चा नवा टीझर रिलीज ! 2 डिसेंबरला होणार ग्लोबल डेब्यू ; भारतातच होणार निर्मिती
Honda ALPHA

होंडा कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीची सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे. Honda ALPHA असं या नव्या इलेक्ट्रिक एसयूव्हीचं नाव असून, तिच्या लॉन्चपूर्वी कंपनीने आणखी एक टीझर जारी केला आहे. विशेष म्हणजे, या टीझरमध्ये पहिल्यांदाच गाडीच्या प्रोडक्शन मॉडेलची झलक पाहायला मिळाली आहे. येत्या 2 डिसेंबर 2026 रोजी होंडा या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा ग्लोबल डेब्यू करणार आहे.

कंपनीने जारी केलेल्या नव्या टीझरमध्ये गाडीच्या पुढील भागाची काही डिझाइन वैशिष्ट्ये दिसत आहेत. यामध्ये फ्रंट लाइटिंग, बंपर आणि ग्रिलची झलक पाहायला मिळते. तसेच गाडीच्या नंबर प्लेटवर ALPHA असं नावही स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, एसयूव्हीचा पुढील भाग अद्याप पांढऱ्या कपड्याने झाकण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या संपूर्ण लूकसाठी ग्राहकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कसा असेल Honda ALPHA चा लूक ?

होंडाने याआधी या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या एक्सटीरियर आणि इंटीरियरचे डिझाइन स्केचेस प्रसिद्ध केले होते. त्यानुसार, या गाडीला आधुनिक आणि आकर्षक लूक देण्यात आला आहे. खास डिझाइनच्या लाइट्स, उठावदार बॉडी आणि दमदार एसयूव्हीची झलक देणारी रचना यात पाहायला मिळू शकते. गाडीच्या इंटीरियरमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपेक्षित आहे. मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, नव्या डिझाइनचा डॅशबोर्ड आणि आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने अद्याप केबिनमधील फीचर्सबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

https://www.prahaar.in/2026/11/24/honda-cb500-launched-in-india-three-variants-with-a-501cc-engine-set-to-take-on-royal-enfield-priced-at-just/

भारतात तयार होणार होंडाची पहिली ग्लोबल इलेक्ट्रिक SUV

Honda ALPHA ची संकल्पना पहिल्यांदा 2025 मध्ये Japan Mobility Show मध्ये 0 Alpha Concept या नावाने सादर करण्यात आली होती. आता कंपनी या कॉन्सेप्टचं प्रोडक्शन मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, ही होंडाची पहिली अशी इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल, जिचं उत्पादन भारतात केलं जाणार असून, जगभरातील बाजारपेठांमध्ये तिची विक्री केली जाणार आहे. राजस्थानमधील टपूकडा येथील होंडाच्या उत्पादन प्रकल्पात या गाडीची निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच भारत केवळ या गाडीची बाजारपेठ नसून जागतिक उत्पादन केंद्रही असणार आहे.

बॅटरी, रेंज आणि किंमत कधी समोर येणार ?

Honda ALPHA च्या बॅटरी क्षमतेबाबत, इलेक्ट्रिक मोटर, ड्रायव्हिंग रेंज आणि चार्जिंग स्पीडबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. त्याचबरोबर या इलेक्ट्रिक एसयूव्हीची संभाव्य किंमत आणि भारतातील विक्रीची तारीखही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष 2 डिसेंबरच्या ग्लोबल डेब्यूकडे लागलं आहे. या दिवशी होंडा आपल्या नव्या इलेक्ट्रिक एसयूव्हीची संपूर्ण माहिती जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही गाडी इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या बाजारात किती प्रभाव पाडते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here