Home क्राईम आधी बॉयफ्रेंडला पळवलं, नंतर तरूणीवर जंगलात अत्याचार; घटनेमुळे नागपूर शहर हादरलं…

आधी बॉयफ्रेंडला पळवलं, नंतर तरूणीवर जंगलात अत्याचार; घटनेमुळे नागपूर शहर हादरलं…

0
आधी बॉयफ्रेंडला पळवलं, नंतर तरूणीवर जंगलात अत्याचार; घटनेमुळे नागपूर शहर हादरलं…
आधी बॉयफ्रेंडला पळवलं, नंतर तरूणीवर जंगलात अत्याचार; घटनेमुळे नागपूर शहर हादरलं... फोटो सौजन्य: सोशल मीडिया

नागपूर: नागपूर शहरातील सोनेगाव तलाव परिसरापासून जवळ असलेल्या एका निर्जन जंगल भागात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या प्रियकरासोबत सोनेगाव तलावाजवळील जंगलाच्या एका निर्जन परिसरामध्ये गेली होती. त्याच दरम्यान एका अनोळखी युवकाने तेथे आला आणि त्याने तरूणीसोबत हा संतापजनक प्रकार केला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/27/dispute-over-md-drugs-leads-to-a-life-threatening-attack-in-nagpur-a-young-man-was-surrounded-by-five-individuals-who-also-assaulted-his-friend/

केलेल्या आरोपांनुसार, त्या युवकाने सर्वात आधी तरुणीच्या प्रियकराला बेदम मारहाण केली आणि त्याला घटनास्थळावरून पळून जाण्यास भाग पाडले. प्रियकर तिथून गेल्यानंतर आरोपीने असहाय्य झालेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता त्याने पीडितेची व्हिडिओ सुद्धा शुटिंग केली. त्यानंतर आरोपीने तरुणीकडील मौल्यवान वस्तू सुद्धा हिसकावून घेतल्या आणि ह्या व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिथून पोबारा केला. ही भयानक घटना घडल्यानंतर सुमारे 24 तासांच्या आत पीडित तरुणीने कुटुंबीयांसह सोनेगाव पोलीस ठाणे गाठले. तिथे तिने घडलेला संपूर्ण प्रकार सांगत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला आणि पुढील तपास सुरू केला.

https://www.prahaar.in/2026/11/27/gold-heist-in-lucknow-five-people-including-police-constable-driver-and-staff-members-arrested/

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सोनेगाव पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेची विविध पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी कामाला लागली आहेत. तपासाचा भाग म्हणून पोलीस जंगल परिसरात ये- जा करण्याच्या मार्गांवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. आरोपी नेमका कोणत्या मार्गाने घटनास्थळी आला आणि गुन्हा केल्यानंतर कोणत्या दिशेने पसार झाला, याचा शोध तपास पथकाकडून घेतला जात आहे. नागपूर गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकारात एकाच आरोपीचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली आहे. तसेच संशयित आरोपीची ओळख पटवता यावी यासाठी पोलिसांनी त्याचा स्केचही प्रसिद्ध केला आहे. या स्केचच्या मदतीने तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध स्तरांवर तपास सुरू असून आरोपीला लवकरच ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

https://www.prahaar.in/2026/11/27/telangana-adilabad-honour-killing-news-father-kills-daughter-before-two-days-of-engagement-love-affair-crime/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here