Home ताज्या घडामोडी ‘रेड बुक’वरून योगी आदित्यनाथांचा विरोधकांना टोला; संविधान दिनी जोरदार टीका!

‘रेड बुक’वरून योगी आदित्यनाथांचा विरोधकांना टोला; संविधान दिनी जोरदार टीका!

0
‘रेड बुक’वरून योगी आदित्यनाथांचा विरोधकांना टोला; संविधान दिनी जोरदार टीका!
Photo: Social Media

Constitution Day 2026: संविधान दिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत लखनौ येथे संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले तसेच लोकशाही मूल्ये व आदर्शांचे पालन करण्याची शपथ घेतली. लोक भवन येथे आयोजित या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी “डॉ. बी. आर. आंबेडकर पुतळा विकास योजने” अंतर्गत सुशोभीकरण कामांचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांचे नाव न घेता संविधान दिनाच्या कार्यक्रमावर निशाणा साधला. कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी यांनी भारत माता आणि डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या चित्रांवर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच काही लोक ‘रेड बुक’ घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला.

योगी आदित्यनाथ नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्री योगी यांनी संविधानाचे महत्त्व आणि मागील सरकारच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही लोक लाल पुस्तक (संविधान) घेऊन संभ्रम निर्माण करतात आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. आपले संविधान आपल्या सर्वांचा अभिमान आहे. तसेच ते 145 कोटी भारतीयांसाठी मार्गदर्शक आहे. आपले संविधान आपल्याला आपल्या हक्कांची आठवण करून देते, आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देते आणि देशाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव करून देते.

https://www.prahaar.in/2026/11/26/pankaj-tripathi-pankaj-tripathi-falls-in-love-with-marathi-theatre-calls-ek-tichi-goshta-wonderful/

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, संविधान आपल्याला केवळ आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देत नाही, तर आपल्या देशाप्रती असलेल्या जबाबदारीची भावनाही निर्माण करते. त्यामुळे संविधान सभेची स्थापना करताना, भारताचे राजकीय भवितव्य भारताची जनताच ठरवेल, हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे विधान संविधानाच्या निर्मात्यांनी लक्षात ठेवले. ते म्हणाले की, आज त्यांना याचा अभिमान आहे की, भारताचे संविधान कोणत्याही भेदभावाशिवाय किंवा प्रादेशिक फरकांशिवाय प्रत्येक प्रौढ भारतीय मतदाराला मतदानाचा हक्क प्रदान करते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे, जर लोकांनी संविधानाची प्रत वाचली असती, तर त्यांनी स्वतःला भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षक म्हणवून घेण्याचे धाडस केले नसते. त्यांनी असा आरोप देखील केला आहे की, स्वतंत्र भारतातील पहिली घटनादुरुस्ती ही वृत्तपत्र स्वातंत्र्याचा बळी देऊन करण्यात आली होती आणि स्वतःच्या स्वार्थासाठी वेळोवेळी संविधानात दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

विरोधी पक्षाच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिक्षण, रोजगार आणि कायदा व सुव्यवस्था यांसारख्या मुद्द्यांवरून विरोधी सरकारच्या मागील कार्यकाळावर टीका केली. जे त्यांच्या कार्यकाळात पूर्णपणे विस्कळीत होते, ते शिक्षणाबद्दल कसे बोलू शकतात? तेव्हा शाळांना इमारतीही नव्हत्या आणि शिक्षकही नव्हते. कॉपी करण्यास प्रोत्साहन देणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच बनला होता, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षावर केली. तसेच तरुणांना रोजगार मिळत नाही. नोकरीची घोषणा होताच खंडणी सुरू होते आणि प्रत्येक प्रश्नपत्रिका फुटते. गरिबांना सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित ठेवले जाते, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जाते आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण केले जात नाही, असा आरोप देखील केला. राज्यातील सर्वात मोठी लोकसंख्या व्यावसायिक माफिया आणि गुन्हेगारांच्या ताब्यात आहे असे लोक कोणत्या विकास, सुशासन, सुरक्षा आणि नैतिकतेबद्दल बोलत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here