Home ब्रेकिंग न्यूज महाविकास आघाडीच्या काळात गुन्हेगारीचा कळस! राऊत-ठाकरेंवर नवनाथ बन यांचा हल्लाबोल; 2020-21 ची आकडेवारी समोर?

महाविकास आघाडीच्या काळात गुन्हेगारीचा कळस! राऊत-ठाकरेंवर नवनाथ बन यांचा हल्लाबोल; 2020-21 ची आकडेवारी समोर?

0
महाविकास आघाडीच्या काळात गुन्हेगारीचा कळस! राऊत-ठाकरेंवर नवनाथ बन यांचा हल्लाबोल; 2020-21 ची आकडेवारी समोर?
(Photo: X)

मुंबई : पुण्यातील गोळीबाराची घटना शेतीच्या वादातून भावकीतील वैयक्तिक भांडणातून घडली असून ती खंडणीशी संबंधित नाही, असे स्पष्ट करत भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालून आरोपींना 12 तासांत बेड्या ठोकल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील घटनेवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी आधी महाविकास आघाडीच्या सत्ताकाळातील कारभाराचा इतिहास तपासावा, असे प्रत्युत्तर बन यांनी गुरुवारी भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिले.

मविआच्या काळात महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर होती आणि पोलिस यंत्रणेचा वापर खंडणी वसुलीसाठी केला गेला, असा आरोप बन यांनी केला. त्यामुळे सध्याच्या सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार विरोधकांना नसल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडलेल्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी पालघरमधील साधूंची हत्या, साकीनाका येथील महिलेवरील अत्याचार व हत्या, सुशांत सिंह प्रकरणाचा संदर्भ, दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेचे समर्थन केल्याचा आरोपही त्यांनी केला.

https://www.prahaar.in/2026/11/26/missile-attack-on-saudi-oil-facility-crude-oil-prices-cross-82-dollars-global-market-turmoil/

पुढे बोलताना नवनाथ बन यांनी पुण्यातील व्यावसायिक आनंद उनवणे यांचे अपहरण व हत्या, अमरावतीतील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांची हत्या तसेच अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथील हिंसाचाराच्या घटनांचा उल्लेख केला. सुषमा अंधारे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत बन यांनी मविआ काळातील गुन्ह्यांची आकडेवारी सादर केली. त्यांच्या दाव्यानुसार, 2020 मध्ये 148 आणि 2021 मध्ये 192 हत्या झाल्या, तर 2020 मध्ये 614 आणि 2021 मध्ये 750 दरोड्यांच्या घटना घडल्या. तसेच खंडणीच्या घटना 2020 मध्ये 204 तर 2021 मध्ये 280 इतक्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील का याबाबत काळच ठरवेल, असे सांगत बन यांनी संजय राऊत यांच्या पत्रकारांवरील संतापावरून टोला लगावला. राष्ट्रवादी आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबतच्या बातम्यांमुळे राऊत व उद्धव ठाकरे यांची अस्वस्थता वाढली असून त्यांनी डॉक्टरांकडून रक्तदाब तपासून घ्यावा आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here