Home देश Indian railways AC coach viral video : धावत्या AC कोचमध्ये दिवा आणि शंखनाद; प्रवाशांच्या जीवाशी खेळल्याचा आरोप, रेल्वेकडून सखोल चौकशीची मागणी

Indian railways AC coach viral video : धावत्या AC कोचमध्ये दिवा आणि शंखनाद; प्रवाशांच्या जीवाशी खेळल्याचा आरोप, रेल्वेकडून सखोल चौकशीची मागणी

0
Indian railways AC coach viral video : धावत्या AC कोचमध्ये दिवा आणि शंखनाद; प्रवाशांच्या जीवाशी खेळल्याचा आरोप, रेल्वेकडून सखोल चौकशीची मागणी

मुंबई : चालत्या वातानुकूलित (AC) रेल्वेच्या डब्यात एका प्रवाशाने चक्क दिवा प्रज्वलित करून आणि शंख वाजवून पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत असून, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक ठिकाणच्या नियमांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये हा प्रवासी प्रवासादरम्यान बंद एसी डब्यात धार्मिक विधी पार पाडताना, दिवा लावताना आणि शंख फुंकताना दिसून येतो. या प्रकारावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक प्रवासी असलेल्या बंद डब्यात उघडा दिवा किंवा आग लावणे किती जीवघेणे ठरू शकते, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. कोणाचीही धार्मिक भावना किंवा श्रद्धा असणे ही वैयक्तिक गोष्ट आहे, मात्र रेल्वेच्या डब्यात आग पेटवणे हे इतरांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करणारे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.

रेल्वे प्रशासनाकडून तपशीलाची मागणी

https://www.prahaar.in/2026/11/26/sbi-clerk-main-exam-2026-begins-recruitment-process-for-9766-posts-get-all-the-details-here/

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित घटनेचा तपास करण्यासाठी आणि जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी रेल्वेने अधिक माहिती मागितली आहे. यामध्ये घटनेची तारीख, वेळ, रेल्वे गाडीचा क्रमांक, प्रवासाचा पीएनआर (PNR) किंवा यूटीएस (UTS) क्रमांक आणि तक्रार करणाऱ्याचा मोबाईल नंबर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रकरणाचा योग्य प्रकारे तपास करून पुढील पावले उचलण्यासाठी हे तपशील आवश्यक असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. तसेच, अशा घटनांची त्वरित दखल घेतली जावी यासाठी प्रवाशांनी ‘रेलमदत’ (railmadad.indianrailways.gov.in) या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी किंवा १३९ या मदत क्रमांकावर फोन करावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

या घटनेनंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत संबंधित प्रवाशावर कडक टीका केली आहे. सहप्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या व्यक्तीवर कठोर कारवाई करून त्याला अटक करावी, अशी मागणी एका युजरने केली आहे. दुसऱ्या एका युजरने हा प्रकार म्हणजे शिक्षणाचा आणि नागरी शिस्तीचा अभाव असल्याचे म्हटले आहे. पूजा करणे हा वैयक्तिक विषय असला, तरी चालत्या ट्रेनमध्ये दिवा लावणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे असून यामुळे शेकडो लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो; अशा गोष्टींचे समर्थन करणे थांबवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया आणखी एका युजरने नोंदवली आहे. मात्र, व्हिडिओमध्ये दिसणारा प्रवासी कोण आहे आणि ही घटना नेमकी कोणत्या गाडीत घडली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here