Home क्रीडा टीम इंडियात मोठा बदल होणार? न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी सिराजची एन्ट्री पक्की; कोणाचा पत्ता कट होणार?

टीम इंडियात मोठा बदल होणार? न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी सिराजची एन्ट्री पक्की; कोणाचा पत्ता कट होणार?

0
टीम इंडियात मोठा बदल होणार? न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी सिराजची एन्ट्री पक्की; कोणाचा पत्ता कट होणार?
टीम इंडियात मोठा बदल होणार? न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी सिराजची एन्ट्री पक्की; कोणाचा पत्ता कट होणार? (Photo: ANI)

क्राइस्टचर्च: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळला जाईल. मालिकेचा निकाल या सामन्यावर ठरणार आहे. कारण पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरला होता. त्यामुळे मालिकेत 0-0 अशी स्थिती आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करतील. इतकंच काय तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत या सामन्याच्या निकालामुळे फरक दिसून येणार आहे.त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. असं असताना दुसऱ्या कसोटीपूर्वी सर्वाधिक चर्चेचा विषय भारतीय संघाचा अंतिम 11 क्रिकेटपटूंचा संघ आहे. मोहम्मद सिराज संघात परतणार का? रवींद्र जडेजा अंतिम 11 क्रिकेटपटूंमध्ये परतणार का? की शुभमन गिल पहिल्या कसोटीतील संघच कायम ठेवणार? हे सर्व प्रश्न क्रीडाप्रेमींना पडले आहेत.

सिराज संघात का असावा?

पहिल्या कसोटीत त्याचा अंतिम 11 खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराजचा समावेश नव्हता. त्यामुळे माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञांनी टीकेची झोड उठवली होती.मात्र संघ व्यवस्थापनाने त्या निर्णयाची पाठराखण केली होती. असं असताना दुसऱ्या कसोटीपूर्वी त्याच्या पुनरागमनाची चर्चा वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारताच्या परदेशातील कसोटी विजयांमध्ये सिराजचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. आकडेवारीनुसार, गेल्या सात वर्षांहून अधिक काळात भारताने सिराजशिवाय आशियाबाहेर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. या काळात, संघाच्या परदेशातील सर्व 10 कसोटी विजयांमध्ये सिराज अंतिम 11 क्रिकेटपटूंमध्ये होता.

सिराजसाठी कोणाला बसवणार?

पहिल्या कसोटीत आकाश दीप आणि अंशुल कंबोज यांना संधी देण्यात आली होती. कंबोजची फलंदाजी आणि आकाश दीपच्या गोलंदाजीमुळे संघ व्यवस्थापनासमोर निवडीचा पेच निर्माण झाला आहे. गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनीही स्पष्ट केले आहे की, सर्व वेगवान गोलंदाज तंदुरुस्त आणि उपलब्ध आहेत. त्यामुळे, जर सिराजला संधी मिळाली, तर आकाश दीप आणि कंबोज यांपैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते.

https://www.prahaar.in/2026/11/26/asia-cup-rising-stars-2026-ind-vs-sl-semi-final-the-toss-goes-in-india-favour-captain-tilak-varma-opting-to-bat-first-says/

गुरनूर ब्रारचं काय?

गुरनूरच्या पदार्पणाचीही चर्चा आहे. त्याने आपल्या अलीकडील कामगिरीने प्रभावित केले आहे आणि संघ व्यवस्थापनाला त्याला भविष्यातील संधींसाठी तयार करायचे आहे. सिराजऐवजी त्याला प्राधान्य दिले जाऊ शकते. जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि प्रसिद्ध कृष्णा संघात कायम असतील.भारतीय संघासमोर आणखी एक मोठा प्रश्न रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याबाबत आहे. पहिल्या कसोटीत जडेजाच्या जागी सुंदरला संधी देण्यात आली होती. पहिल्या डावात त्याने न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांपेक्षा चांगली कामगिरी केली, पण दुसऱ्या डावात त्याच्याकडून अधिक योगदानाची अपेक्षा होती.

रवींद्र जडेजाला संधी मिळणार का?

संघ व्यवस्थापन सुंदरवर विश्वास कायम ठेवेल की अनुभवी जडेजाला संघात परत आणेल, हे पाहणे बाकी आहे. जडेजा गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये उपयुक्त योगदान देऊ शकतो. दुसरीकडे, सुंदरने मागच्या कसोटीत मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यामुळे, दोघांपैकी निवड करणे हा एक कठीण निर्णय असेल. जर अंशुलच्या जागी गुरनूरचा समावेश केला गेला, तर फलंदाजीचे पर्याय मजबूत करण्यासाठी जडेजाला संधी दिली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here